मारिया महाविद्यालय मुल येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचे आयोजन
2 ऑक्टोंबर 2024 महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहामध्ये दररोज महाविद्यालय परिसर आणि आजूबाजूचा संपूर्ण ग्राम परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेचे महत्व पटावे याकरिता महाविद्यालय स्तरावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. दिनांक 2 ऑक्टोबर 2024 ला सप्ताहाची सांगता करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. भास्कर सुकारे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापिका कविता शेंडे आणि प्राध्यापिका गीतांजली माशाखेत्री लाभले होते. महात्मा गांधीच आवडत भजन वैष्णव जन तो तेने काहिये गायन प्राध्यापिका मशाखेत्री मॅडम यांनी केले. रामधून चे गायन प्राध्यापिका कविता मॅडम यांनी केले. गांधीजींनी दिलेला शांतीचा मंत्र आणि उपासना याचे वाचन. गांधीजींचा दुसरा आवडतो भजन रघुपती राघव राजाराम त्याचं गायन करून महात्मा गांधीजीच्या आणि लाल बहादूर शास्त्री चे कार्यावर प्रकाश टाकून माननीय प्राचार्य डॉ. भास्कर सुकारे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. मारिया महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व कर्मचारी वृद यांनी स्वयं इच्छेने अनेक थोर पुरुषांची प्रतिमा महाविद्यालयाला भेट दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक प्रणय उराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रोशन तिवाडे यांनी केले. समस्त प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी वृंदा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.