जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस सदैव दक्ष, कुपवाड सहा. पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांची ग्वाही

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/10/2024 2:26 PM

कुपवाड - दि.२,
ज्येष्ठ  नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस सदैव दक्ष राहतील, अशी ग्वाही कुपवाड एमआयडीसी  पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक  दीपक भांडवलकर यांनी दिली. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तथास्तु ज्येष्ठ नागरिक संघ व कुपवाड पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने  संवाद बैठक झाली. त्यात श्री. भांडवलकर बोलत होते.
तथास्तु ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  सन्मती गौंडाजे  यांनी स्वागत केले.  ज्येष्ठ नागरिक दिनाची पार्श्वभूमी सांगून तथास्तु  नागरिक संघामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती श्री. गौंडाजे यांनी दिली. यावेळी कुपवाड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा  सन्मान तथास्तु ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने श्री भांडवलकर यांनी केला.  भूपाल  कवठेकर, नेमगोंडा पाटील, कल्लाप्पा कवठेकर,  महावीर कोथळे, महावीर कर्नाळे, बाळासाहेब दानोळे,  सुमन चंदुरे यांच्यासह  वयोवृद्ध व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला. श्री भांडवलकर यांनी सांगितले,विविध योजनांच्या माध्यमातून शासन ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देत आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीसही दक्ष आहेत. एकल राहणारी व्यक्ती,कुटुंबातील वाद,   ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास, मालमत्तेतील वाद यासंदर्भात पोलीस हे समन्वयकाची भूमिका स्वीकारून कार्य करतात. आपल्या अडचणींच्या  निराकरणासाठी आपण पोलिसांशी थेट संपर्क साधावा,  असे आव्हान श्री. भांडवलकर यांनी यावेळी केले.  शिवानंद गव्हाणे, स्नेहल गौंडाजे,  विजय वाघमारे, उत्तम होनमोरे, दिनकर लोकरे  यांनी संयोजन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या