"ओबीसी बहुजन आघाडी अमरावती यांचे मा.श्री अतुलजी सावे मंत्री यांना निवेदन"

  • Nitin Ganorkar (Paratwada)
  • Upadted: 02/10/2024 12:50 PM

अमरावती : ओबीसी बहुजन आघाडी अमरावती तर्फे इतर मार्गासवर्गीय विद्यार्थ्यांची भारत सरकार शिष्यवृत्तीचे न्यूनतम आर्थिक मर्यादा 1.50 लाखावरून 2.50 लाख रुपये करण्याबाबत मा. मंत्री श्री अतुलजी सावे महाराष्ट्र शासन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुंबई यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात भारत सरकार कल्याण मंत्रालय यांनी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या शिष्यवृत्ती योजना अंतर्गत इतर मागासवर्गीय विद्यार्थी करिता आर्थिक न्यूनतम उत्पन्न मर्यादा रुपये 65,290/- वार्षिक इतकी होती ती रु. 1 लाख करण्यात आली. नंतर ती महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये दिलेल्या लक्षवेधी सूचनाचे  निवेदन मध्ये दिसून येते. नंतर भारत सरकार व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शा. नि. 18 सप्टेंबर 2018 व 22 मार्च 2019 नुसार ही शिष्यवृत्ती आर्थिक मर्यादा रु.1.50 लाख करण्यात आली तथापि एससी/एसटी करिता भारत सरकार शिष्यवृत्ती करिता न्यूनतम  शिष्यवृत्ती करिता आर्थिक मर्यादा रु. 2 लाख वरून  रु.2.50 लाख करण्यात आली. तरी सदर निवेदनात महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती मर्यादा रु.2.50 लाख, वर्ष 2024-25 पासून लागू करावी ही विनंती निवेदनात करण्यात आलेली आहे. या  निवेदना करिता श्री अशोकराव दहीकर विदर्भ अध्यक्ष, श्री प्रवीण भाऊ पेटकर जिल्हाध्यक्ष, श्री नंदू भाऊ सहारे जिल्हा उपाध्यक्ष, श्री संजय वाघोळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व श्री तुषार वाढणकर जिल्हा संघटक या सर्वांनी या निवेदनाकरता पुढाकार घेतला.

Share

Other News

ताज्या बातम्या