"एक झाड एक गणपती उपक्रम"

  • Nitin Ganorkar (Paratwada)
  • Upadted: 07/09/2024 5:47 PM

परतवाडा (जि. अमरावती) : "एक झाड एक गणपती उपक्रम" या उपक्रमांतर्गत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणाला घातक असून 100% मातीच्या गणपती मूर्ती घ्या व पर्यावरण संवर्धनास हातभार लावा या उपक्रमात भाग घेण्यासाठी आम्ही दिलेली मातीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्यासोबत दिलेल्या झाड आपल्याला लावायचे आहे व विसर्जन करताना विघटनशील साहित्य व गणपती घरी विसर्जन करून माती झाडाला टाकायची आहे. 'निसर्गाशी नाते जोडा इको फ्रेंडली गणेशाला वंदन करा'. या उपक्रमात मातीचे गणेश मूर्ती सोबत आपल्याला एक झाड मोफत मिळेल मातीची मूर्ती घरीच विसर्जन करून ती माती झाडाला टाका असे आव्हान स्वराज एक ध्यास बहुउद्देशीय संस्था रजि. नंबर महा 1027/014 अंतर्गत दरवर्षी करण्यात येते. स्थळ श्री वाघा माता मंदिर संस्थान परतवाडा. ह्या उपक्रमाला सहभाग देणारे श्री दीपक देशमुख सर श्री उमेश भिमटे सर तसेच प्रादेशिक वनविभाग वनपरिक्षेत्र परतवाडा यांच्या सहयोगाने हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येते.

Share

Other News

ताज्या बातम्या