सांगली रेल्वे स्टेशन वरून एका वर्षात २० लाखापेक्षा जास्त प्रवाशांनी केला प्रवास...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/09/2024 2:40 PM

*सांगली रेल्वे स्टेशनची NSG3 या वरिष्ठ श्रेणी कडे आगेकुच*

*सांगली रेल्वे स्टेशन वरून 1एप्रिल 2023 ते 31मार्च 2024 या वर्षभरात 20 लाख पेक्षा जास्त प्रवाशांनी केला प्रवास*

सांगली जिल्हा नागरीक जाग्रुती मंचच्या "सांगली स्टेशन वाचवा" या मोहीमेस  सांगली जिल्हातील प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद

*सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने वेळोवेळी सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या 60 रेल्वे गाड्यांच्या तिकीट आरक्षण उपलब्धता, तिकीटे कशी बुक करावी तसेच शाळा, महाविद्यालय सहलीसाठी रेल्वे तिकीटे सांगली स्टेशनवरून भरपूर तिकीटे उपलब्ध असल्याची माहीती दिली तसेच सांगली स्टेशनच्याट वेळापत्रक बाबत जनजागृती मोहीम हाती घेतली त्याचा मोठा फायदा झाला आहे*

सांगली रेल्वे स्टेशन वाचवा अभियानानंतर सांगली रेल्वे स्टेशन येथे मैसूर-उदयपूर पॅलेस क्वीन एक्सप्रेस, जोधपुर-बेंगलोर एक्सप्रेस, दर्शन एक्सप्रेस व मिरज-बिकानेर एक्सप्रेस या 4 सुपरफास्ट लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा थांबा सांगली रेल्वे स्टेशनला मिळाला.

*सांगली रेल्वे स्टेशन वाचवा आंदोलनाने इतिहास घडवला आणि 13 मार्च 2024 हा दिवस सांगली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक दिन ठरला*
13 मार्च 2024 रोजी सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेस ही सांगली जिल्ह्याचे नाव असलेली पहिली एक्सप्रेस रेल्वे गाडी सांगली रेल्वे स्टेशन वरून सुरू झाली.

त्याच दिवशी सांगली-परळी एक्सप्रेस वाया पंढरपूर, लातूरमार्गे सांगली जिल्ह्याचे नाव असलेली दुसरी एक्सप्रेस रेल्वेगाडी देखील सांगली रेल्वे स्टेशन वरून सुरू झाली.

*सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचच्या रेल्वे जनजागृती अभियानामुळे सांगली रेल्वे स्टेशन वरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या 2023-24 वर्षात 20 लाखापेक्षा जास्त झाली आहे*

माहिती अधिकारांतर्गत सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांना मिळालेल्या काही आकडेवारून खालील अंदाजित संख्या मिळवली आहे.

*सांगली स्टेशनचे प्रमुख आकडे*

1) सांगली रेल्वे स्टेशनवर आरक्षित तिकिटांवर येणारे जाणारे प्रवासी - 9 लाख 

2) सांगली रेल्वे स्टेशनवर अनआरक्षित जनरल तिकिटांवर येणारे जाणारे प्रवासी - 4 लाख 

3) सांगली रेल्वे स्टेशनवर मासिक पासवर येणारे जाणारे प्रवासी - 7 लाख

4) सांगली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफाॅर्म तिकीट घेऊन येणारे प्रवासी - 1 लाख

सांगली स्टेशन - एकूण प्रवासी 21 लाख

सध्या सांगली रेल्वे स्टेशन NSG4 कक्षेत असून वीस लाख पेक्षा जास्त प्रवासी झाल्यामुळे आता हा स्टेशन NSG3 कक्षेत जाईल.

सांगली रेल्वे स्टेशन येथील सतत वाढणारी प्रवाशांची संख्या व सतत  वाढणारे उत्पन्न लक्षात घेऊन सांगली रेल्वे स्टेशनला आता NSG3 दर्जा देण्याची मागणी नागरिक जागृती मंच करणार आहे. तशा प्रकारचे लिखित पत्र मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक व मध्य रेल्वे पुणे भविभागाचे डीआरएम यांना देण्यात येणार असून सांगली रेल्वे स्टेशनला NSG3 कक्षेत टाकून या रेल्वे स्टेशनवर रिटायरिंग रूम, पार्सल बुकिंग सुविधा, क्लोक रूम त्याचप्रमाणे कोचिंग टर्मिनल, पिट लाईन, रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा, इंजिन ड्रायव्हर व गार्ड यांना आराम करण्यासाठी आराम कक्ष तसेच रनिंग रूम त्वरित बांधण्यात यावे ही मागणी करण्यात येणार आहे. 

*सांगली स्टेशन वरून खालील नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी जोर लावण्यात येईल*

1) सांगली-मेंगलोर एक्सप्रेस वाया मिरज बेळगाव मडगाव गोवा

2) सांगली-चेन्नई एक्सप्रेस वाया मिरज हुबळी गदग

3) सांगली-विजयवाडा एक्सप्रेस वाया मिरज पंढरपूर सोलापूर हैदराबाद

4) सांगली-निजामाबाद हळदी नगरी एक्सप्रेस

5) सांगली-कोयंबतूर एक्सप्रेस व्हाया मिरज हुबळी

6) सकाळी सुटणारी मिरज कुर्डूवाडी रेल्वे गाडी सांगली रेल्वे स्टेशन वरून सोडावी

7) सकाळची कोल्हापूर-मिरज लोकल गाडी किर्लोस्करवाडी पर्यंत विस्तार करावी

*सांगली रेल्वे स्टेशन उत्तरोउत्तर प्रगती करत असतानाच सांगली स्टेशन संपवण्याचा डाव मध्य रेल्वेचे काही उच्च अधिकारी अजूनही खेळत आहेत*

सांगली रेल्वे स्टेशन रेल्वे बोर्डाच्या निकषांपेक्षा प्रति गाडी प्रति फेरी 8-10 पट जास्त उत्पन्न देत असून देखील मध्य रेल्वेचे काही अधिकारी हुबळी-सांगली मार्गे सुरु होणाऱ्या प्रस्तावित नवीन राजधानी एक्सप्रेस, वंदेभारत एक्सप्रेस, अमृतभारत एक्सप्रेस, वंदेभारत स्लीपर एक्सप्रेस, दुरंतो, तेजस, शताब्दी व इतर प्रीमियम विशेष रेल्वे गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा नाकारला जाणार असल्याची माहिती सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचला कळली आहे.

*सांगलीत संपर्क क्रांति, राजधानी एक्सप्रेस, वंदेभारत  व इतर सुरू होणाऱ्या सर्व नवीन रेल्वे गाड्या सांगली स्टेशनवर थांबल्यास पाहिजेत अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल*

सांगली जिल्हा नागरीक जागृती मंच सांगली स्टेशनवर नविन रेल्वे गाड्या थांबू न देण्याचा मध्य रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांचा डाव हाणून पाडेल. यापुढे सांगली मार्गे सुरु होणाऱ्या कुठल्याही रेल्वे गाडीला जर सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला नाही तर सांगली जिल्ह्यातील तमाम नागरिकांना एकत्र घेऊन नागरिक जागृती मंच तीव्र आंदोलन करेल व सर्व रेल्वे गाड्या थांब सांगली रेल्वे स्टेशनवर थांबण्यास भाग पाडेल.

Share

Other News

ताज्या बातम्या