शुन्य अपघात जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करा. - खासदार प्रतिभा धानोरकर संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न.

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 06/09/2024 1:39 PM

शुन्य अपघात जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करा. - खासदार प्रतिभा धानोरकर
संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न.

रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाने आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडावी, असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत व्यक्त केले.

संसदीय रस्ता सुरक्षा समिती ची बैठक दि. 05 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीच्या अध्यक्षा म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या अनेक महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त ब्लॅक स्पॉट ची माहिती घेऊन त्या बद्दल उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. त्यासोबतच ओव्हर लोड, वाहतूकीचा प्रश्न अत्यंत गंभीर असून याकडे लक्ष देणे गरजेचे असून ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करावी, असे देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. रस्ता सुरक्षेसंदर्भात सर्व आवश्यक त्या उपाययोजना करुन अपघात शुन्य जिल्हा व्हावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या. यावेळी मंचावर आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर शहर मनपा आयुक्त विपिन पालिवाल यासह मोटर परिवहन मंडळाचे श्री. मेश्राम, अधिक्षक अभियंता गाडेगोणे कार्यकारी अभियंता श्री. कुंभे त्यासोबत विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या