न्यु प्रायमरी स्कूल कुपवाड येथे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/09/2024 1:18 PM

✨ नव महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित ,न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड येथे आज दिनांक 5/ 9/2024 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . 
   "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसं चालावं याचा धडा शिकवणारे शिक्षक रुपी  देव माणसांना वंदन !" शिक्षक दिनानिमित्त सर्व गुरुजींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

     आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर .1 कुपवाड चे सहा. शिक्षक मा. श्री. रामराव पाटील सर, संस्थेचे सेक्रेटरी रितेश सर, विद्यार्थी मुख्याध्यापक चि. आदित्य भोसले सर व उपमुख्याध्यापिका कु. समीक्षा बेळगी मॅडम उपस्थित राहिले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन  प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले . आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी मुख्याध्यापक चि. आदित्य भोसले सर यांनी केले.  शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिक्षक दिनाविषयी माहिती सांगितली.  शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुंदन जमदाडे सर ,पर्यवेक्षक श्री. अनिल शिंदे सर  यांनीही शिक्षक दिनाविषयी मुलांना मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचा गुलाब पुष्प देऊन  सन्मान करण्यात आला.
       प्रमुख पाहुणे यांनी मुलांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. रितेश शेठ सर उपस्थित राहिले.त्यांनी शिक्षकदिनानिमित्त सर्व शिक्षक-शिक्षिकांना गुलाबपुष्प देऊन,संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान केला.आजच्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक- शिक्षिका विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु. वैभवी बने मॅडम यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या