चाभरा येथील समर्थ अकॅडमी समूह येथे शिक्षक दिन साजरा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 06/09/2024 11:42 AM

नांदेड :- समर्थ अकॅडमी समूह चाभरा, अर्धापूर येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकॅडमी चे संचालक श्री.मयुर नरोटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद डाखोरे कार्यकर्माचे मार्गदर्शक अशोक मस्के व सुनील नरोटे  यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच  सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.गेल्या पाच वर्षा पासून चाभरा व लहान या सारख्या ग्रामीण भागात शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम समर्थ अकॅडमी समुह करत आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाला मार्गदर्शन म्हणून लाभलेले प्रा.‌डाखोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत‌ असताना एक कुशल कुंभार जसा मातीचे भांडे बनवतो तसाच एक कुशल शिक्षक आदर्श पिढी घडवतो. असे त्यांनी सांगितले यानंतर अशोक मस्के यांनी विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी बोलत असताना स्वतःची आवड व क्षमता ओळखून आपले करिअर निवडावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. 
तद्नंतर विध्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.‌ त्या मध्ये श्रध्दा संगेवार,आरुष रनविर, रोनक बोले,श्रीनिवास स्वामी, लक्ष्मण मनुरे, रिद्धी संगेवार,सानिका फरांडे, सत्यम संगेवार, मनस्वी बाऱ्हाटे , रिद्धी पाटील, सत्यम साळवे,अक्षरा जाधव, वरद पांचाळ, गणेश राठोड, रजनंदिनी शेलगावकर. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आस्मिता बोले व विशाखा सुर्णकार यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष समर्थ अकॅडमी समूहाचे संचालक मयुर नरोटे यांनी प्रास्ताविक केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रा.सुनील नरोटे यांनी मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या