सामिकु मनपाच्या मेहेरबानीने गारपीर चौकात आणखी एका रस्त्याला भगदाड, महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचा ऑडिट व्हावे: मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/09/2024 11:34 AM


सांगली प्रतिनिधी 
              सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर भलेमोठी भगदाड पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे . गारपीर चौकामध्ये रस्त्याला गेल्या चार दिवसांपासून भगदाड पडले असून त्यातून ड्रेनेजचे पाणी वाहताना दिसत आहे .महानगरपालिका प्रशासनाने याच्या कडेला फक्त बॅरिकेट्स लावण्याचेच काम केले आहे.या भगदाडांमधून पाणी वाहत असल्याने हे भगदाड मोठे होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. धोका वाढण्याची शक्यता असून रहदारीचा मार्ग असल्याने एखादी गाडी अथवा एखादा नागरिक त्यामध्ये जाऊ शकतो. महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे रस्त्यावरून फिरणे धोक्याचे होत आहे.या रस्त्यावरील भगदाडांना केवळ आणि केवळ महानगरपालिका प्रशासनातील बांधकाम आणि दैनंदिन विभागच जबाबदार असल्याने आयुक्त शुभम गुप्ता यांनी त्यांच्यावर लवकर लवकरात कारवाई करावी.का एखाद्या प्रवाशाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल करत लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी महापालिका क्षेत्रातील सगळ्या रस्त्यांचे  ऑडिट करावे अशी मागणी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली आहे.
       सध्या गणेश उत्सवासह सणासुदीचे दिवस असल्याने हजारो नागरिकांची वर्दळ असते.शिवाय गणेश आगमनाच्या मिरवणूकही या रस्त्यावरून जाणार आहेत त्यामुळे एखादी दुर्घटना सदर खड्ड्यांमुळे घडू नये एवढीच अपेक्षा असून नागरिकांनीही आपल्या जीवाची काळजी करत सावधपणे रस्त्यावरून प्रवास करावा असे अवाहनही मनोज भिसे यांनी केले आहे .

Share

Other News

ताज्या बातम्या