सांगली- पेठ रस्त्याला क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव द्यावे, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/09/2024 11:25 AM

प्रति 
मा.नाम.एकनाथ शिंदे 
  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 

महोदय 

*सांगली पेठ रस्त्याला क्रांतिवीर* *डाॅ. नागनाथ* *आण्णा नायकवडी यांचे नाव* देण्यात बाबत

सांगली पेठ रस्ता व्हावा यासाठी गेल्या दहा वर्षापासून प्रयत्न चालु आहेत. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. या साठी सर्व सांगली तसेच या रस्त्यावर येणाऱ्या गावकर्‍यांनी योगदान दिल्यामुळे आज हा रस्ता पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहे. आगोदर हा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात होता. पुढे तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला. आणी रत्नागिरी नागपूर महामार्ग १६६ ला जोडण्याचा निर्णय झाला. काही दिवसात तो पुर्ण होउन त्यावरुन पुर्ण क्षमतेने वहातूक सुरु होईल. 
हा महामार्ग पुर्ण झाल्यानंतर या महामार्गाला पद्मभुषण क्रांतिवीर डाॅ. नागनाथ आण्णा नायकवडी यांचे नाव देण्याची मागणी आम्ही करीत आहोत. 
पद्मभूषण क्रांतिवीर डाॅ. नागनाथ आण्णा नायकवडी यांचा सारा इतिहास आपणा सर्वांना ज्ञातच आहे. नागनाथ आण्णांचे  स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आपण कधीच विसरणार नाही. त्यांनी जिवाची बाजी लावून स्वातंत्र्य लढा पुढे नेहला. यासाठी घरदार, संसार याचा काहीही विचार न करता घरावर तुळशीपत्र ठेवुन त्यांनी लढ्याचे नेतृत्व केले. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा गोरगरीब,कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दलित, अदिवासी, धरणग्रस्त, प्रकल्प ग्रस्त, दुष्काळ ग्रस्त यांचेसाठी लढा चालु ठेवला. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहीजे यासाठी १३ दुष्काळी तालुक्यातील शेतकरी एकत्र करुन या तालुक्यांना पाणी मिळाले पाहीजे यासाठी पाणी चळवळ उभी केली.  परिणामी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचले. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसकरी शेतकऱ्यांना सात्यांने ऊसाला सगळ्यांपेक्षा जास्त दर देवुन ऊस शेती फायद्यात आणली. हे सारे योगदान पाहता या महामर्गाला नागनाथ आण्णांचेच नाव साजेसे ठरेल. म्हणून या महामार्गाचे  *पद्मभूषण क्रांतिवीर डाॅ* . *नागनाथ आण्णा नायकवडी महामार्ग* असे नामकरण करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.

सतीश साखळकर उमेश देशमुख विकास मगदूम गजानन साळुंखे महेश खराडे  

सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा


Share

Other News

ताज्या बातम्या