शिक्षकदिनीच ग्रंथपालाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 06/09/2024 6:58 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

दहिवडीतील महात्मा गांधी विद्यालयातील तील प्रकार, पालकांमधून संताप व्यक्त 

दहिवडी : ता.
दहिवडीच्या महात्मा गांधी विद्यालयात  मद्यधुंद ग्रंथपालाने इयत्ता सहावीतील एका विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना शिक्षक दिनीच घडल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. 
शिक्षक दिना दिवशी ग्रंथपाल असलेल्या जंगम नामक शिक्षकाने विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीचा विषय शिक्षकांनीही दडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विद्यार्थ्यांने पालकांना ही घटना सांगितल्यावर पालकांनी थेट
महात्मा गांधी विद्यालय गाठले. यावेळी पालकाने शिक्षकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. यानंतर महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्यांनी ग्रंथपालाच्या या चुकीवर पांघरून घालण्यासाठी पोलीस स्टेशनला फोन केल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर पालक संदीप जोतिराम जाधव यांनी आक्रमक होत पोलीस स्टेशन गाठून संबंधित जंगम ग्रंथपालाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये संबंधित ग्रंथपालाने सहावीत शिकणाऱ्या मुलास आता बुक्क्यांनी मारहाण करत तुला ठेवतच नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. 
शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जंगम नामक शिक्षकाला आमच्यासमोर हजर नाही केले तर शाळेसमोर सर्व पालक मिळून आंदोलन करणार असल्याची आक्रमक भूमिका पालक पीडित विद्यार्थ्याचे पालक संदीप जोतीराम जाधव यांनी घेतली आहे. हा प्रकार मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना समजताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी जावून सदर प्रकार जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी झालेल्या घटनेवर संताप व्यक्त करत हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असे म्हणत संबंधित ग्रंथपालावर कारवाईची मागणी केली आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक, मनसेचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे , बालाजी जगदाळे, अनिल जाधव, हरिभाऊ जाधव, यांच्यासह पालक, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या