शिक्षक दिनानिमित्त राष्टवादी शरदचंद्र पवार कवलापूर जिल्हा परीषद शाळेला पंखे प्रदान

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/09/2024 7:57 PM

आज शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने कवलापुरातील जिल्हा परिषद शाळा नं.- 2 ला पंखे प्रदान करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद शाळा नं.-2 मध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय लक्ष्यात घेता ईलेक्ट्रॉनिक पंखे शाळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने अभिजित कांबळे  यांच्या विशेष सहकार्याने देण्यात आले.

भारतीय शिक्षण व्यवस्थेत ज्यांनी मोलाचे योगदान दिले असे जोतिबा फुले,सावित्रीबाई फुले तसेच डॉ. सर्वपल्ली राधकृष्ण यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थी घडत असताना आईच्या रूपातून पाहिला गुरु आपल्याला लाभतो नंतर मात्र विद्यार्थी घडवण्यात शालेय शिक्षकांचा फार मोठा वाटा असतो.
गुरूंच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होत नसतो म्हणून आज शिक्षक दिनाचे औचित्य साधत कवलापुरातील जिल्हा परिषद शाळा नं. - 2 मधील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ईलेक्ट्रॉनिक पंखे देण्यात आले तसेच शाळेतील शिक्षक वृंदाचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला.
 
जिल्हा परिषेदेच्या शाळा आज खरंच कात टाकत आहेत.अत्यंत हुशार विद्यार्थी आज कवलापुरातील जिल्हा परिषद शाळेत पहायला मिळाली.
विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक ही अतिशय डेडिकेटेड होऊन विद्यार्थ्यांना शिकवतात.
शाळेतील शिक्षकांचे टीम वर्क वाखान्याजोगे होते.
विद्यार्थ्यांच्याप्रती असणारी तळमळ जाणवली.
आज त्याठिकाणी शाळेसाठी काही पायाभूत सुविधांची गरज आहे.तरी विविध स्वयंसेवी संस्थानी शाळेस आपल्या परीने शक्य होईल तेवढी मदत करावी.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहरजिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादल शहरजिल्हा उपाध्यक्ष जुबेर मुजावर,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादल शहरजिल्हा संघटक  ऍड. प्रतिक्षा हेगडे,दिगंबर मोहिते तसेच शाळेच्या मुख्याधिपिका, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या