आयुक्तांनी वॉटर वर्क्स बिल्डींग चे स्ट्रक्चरल ऑडीट करावे : मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/08/2024 12:31 PM

  सांगली शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हिराबाग कॉर्नरवर महानगरपालिकेचा वॉटर हाऊस विभाग कार्यरत आहे .परंतु सध्या या वॉटर हाऊस ची अवस्था दयनीय झाली असून या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे*
शिवाय कर्मचाऱ्यांनी पान मावा गुटखा खाऊन इथल्या भिंती रंगवल्याचे दिसत आहे.तर दारूच्या बाटल्या आणि मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून वॉटर हाऊस ची कचराकुंडी केली आहे.शिवाय सदर बिल्डिंग अत्यंत जुनी झाली असून स्लॅबची अवस्था खिळखिळी झाल्याचे दिसत आहे त्यामुळे सदर बिल्डिंग धोकादायक बनली असल्याने,नागरिकांच्या मालमत्तांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या महापालिका प्रशासनाने स्वतःच्या मालकीच्याही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे*
     सदर बिल्डिंगला आयुक्त शुभम गुप्ता यांनी भेट देऊन,समक्ष पाहणी करून लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे*  
       मनोज भिसे यांनी सदर बिल्डिंगला नुकतीच भेट देऊन पाहणी केली असता सदर बाबी समोर आल्या आहेत.सांगली शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या वाॅटर हाऊसमध्येच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे मनोज भिसे यांनी म्हटले आहे*

Share

Other News

ताज्या बातम्या