रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री राम करण यादव आज सांगली रेल्वे स्टेशनच्या पाहणी करता आले होते.
सांगली रेल्वे स्टेशनच्या विविध समस्या चालू असलेल्या कामाबाबत व नवीन गाड्या सुरू करण्याबाबत व चालू असलेल्या काही गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशन आणि किलोस्कर वाडी रेल्वे स्टेशनवर स्टॉप नाही आहेत ते स्टॉप बाबत त्यांना मागणी पत्र दिले.
चालू असलेली कामे संत गतीने सुरू असून त्याबाबत सुद्धा सूचना करण्याची विनंती केली
चालू असलेल्या कामाबाबत व नवीन गाड्या सुरू करणे व काही गाड्यांचे स्टॉप मंजूर करण्याबाबत विचार करून कारवाई करण्याची त्यांनी अस्वस्थ केले.
सगळ्यात जिव्हाळ्याची मागणी आणि मोठा प्रश्न निर्माण झालेला चिंतामण नगरच्या पुलाबाबत फार तीव्रपणाने त्यांच्यासमोर आम्ही वाचा फोडली रेल्वेचे कार्यकारी अभियंता श्री पाखरे साहेब यांना सुद्धा सर्व परिस्थिती अवगत आहे सदर पुलाचे काम रेंगाळल्यामुळे सांगली जिल्ह्याचे अर्थकारण कसे बिघडलेले आहे याबाबत त्यांना आम्ही सर्व माहिती दिली तसेच त्यांनी जाताना चिंतामण नगरच्या व पंचशील नगर रेल्वे पुल ची पाहणी करावी व चिंतामण नगरचा पूल लवकरात लवकर पूर्ण होऊन वाहतूक साठी खुल्या करण्यात यावा अशी विनंती केली.
त्या बाबत जागेवर जाऊन पाहणी करू आणि संबधित कॉन्टॅक्टर यांना समज देऊन काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
यावेळी सतीश साखळकर नगरसेवक संतोष पाटील सामाजिक कार्यकर्ते गजानन साळुंखे उपस्थित होते.