आरटी आय न्यूज नेटवर्क
विजय जगदाळे
दि,:माण तालुक्यातील मार्डी येथील पोपटराव मलिकनेर सह. मुख्य कार्यकारी अधिकारी M I D C महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा मार्डी येथे मार्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ, फेटा बांधून त्यांचा सन्मान केला.
पोपटराव मलिकनेर यांनी आपल्या जन्मभूमी असणाऱ्या मार्डी गावासाठी खूप मोठे योगदान दिले आहे सन 2018 मध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ठिकठिकाणी बांध बंधारेच्या
माध्यमातून पाणी अडवून मार्डी गाव दुष्काळ मुक्त केले. पाऊसही चांगला झाला व पडलेले पावसाचे पाणी जमिनीत मुरले. त्यामुळेच मागील चार वर्षात गाव टँकर मुक्त झाले होते.
या वर्षी भवानी मंदिरासाठी 1 कोटी 47 लाख एवढा निधी उपलब्ध करून मंदिरासाठी सभामंडप, रस्ता, कमान ,बाग बगीचा ,पेवर ब्लॉक, पाण्याची टाकी, शौचालय, मंदिरावर तसेच रस्त्यावर ही सोलर लाईट अशा सुविधा उलब्ध करून दिल्या असून हे काम आता पूर्णत्वाकडे गेले आहे. याबरोबरच मार्डी या ठिकाणी भव्य अशी ग्रामसचिवालय इमारत उभारण्यासाठी 1कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे .या इमारतीमध्ये सर्व शासकीय कार्यालये एकत्र येणार असून ग्रामस्थांची मोठी सोय होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मार्डी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने जलजीवन मिशन अंतर्गत 10 कोटी रुपयांची योजना पोपटराव मलिकनेर याच्या प्रयत्नातून मार्गी लागली आहे त्यामुळे पिण्याचे पाणी गावठाण तसेच सर्व वाड्यावस्त्यांवर पोचणार आहे . हे काम 75 टक्के पूर्ण झाले आहे .
त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनासाठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे. छत्रपती शिवाजी विद्यालय मार्डी येथे स्वखर्चाने 12 लाख रुपये मूलभूत गरजेसाठी तसेच, सुशोभीकरण यासाठी त्यांनी दिले आहेत.
समाजभान जपणारे आणि ध्येयवादी, संवेदनशील कर्तृत्व पोपटराव मलिकनेर सेवानिवृत्त होत असून त्यांनी मार्डी गावांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळेच अनेक विकास कामांना गती मिळाली असून सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा समस्त मार्डी ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी हितचिंतक मित्रपरिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.