जळकोटमध्ये सोयाबीनचे पंचनामे सुरू; मंत्रांच्या स्वीय सहायकांनी केली पाहणी

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 30/06/2020 8:01 PM

सध्या महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाने मोठा कहर माजला असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कृषी विभागाच्या स्तरावरून सध्या पंचनामे सुरू आहेत. जळकोट येथे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. परंतु बियाणे उगवले नाही. अशा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी पंचनामे करत आहेत. जळकोट येथे राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला बाल विकास व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलींग स्वामी यांनी कृषी कर्मचाऱ्या समवेत एका शेतात पंचनामा करून पाहणी केली. सध्या कोरोना मुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना, चालू वर्षाच्या खरीप हंगामात काही तरी हाताला लागेल. या आशेवर बँक कर्ज घेऊन व उसनवारी करून शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. यावर्षी सोयाबीनचे महागडे बियाणे खरेदी करून मोठ्या विश्वासाने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली आहे. परंतु बोगस कंपन्यांच्या सुळसुळाटामुळे सोयाबीनचे बोगस बियाणे अव्वाच्या सव्वा किमतीत शेतकऱ्यांच्या माथी मारले गेले आहे. यामुळे बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. शासन स्तरावर सध्या पंचनामे सुरू आहेत. जळकोट शिवारातही सध्या पंचनामे सुरू आहेत. जळकोट येथील महिला शेतकरी श्रीमती पुतळाबाई रायप्पा यादगौडा यांच्या जळकोटवाडी रस्त्यालगत असलेल्या शिवारात कृषी विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. यावेळी कृषी कर्मचाऱ्यासमवेत राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला बाल विकास व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांनी स्वतः उपस्थित राहून सोयाबीन बियाणे उगवत नसल्याची पाहणी केली. सात लिंग स्वामी यांनी यावेळी तालुका कृषी अधिकारी एन. टी. गायकवाड यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून जळकोट येथे पंचनाम्याचे उत्कृष्ट काम कृषी विभाग करीत आहे. आपल्या कर्मचाऱ्यांचे काम हे उत्कृष्ट आहे. जळकोट प्रमाणेच तालुक्यात पंचनाम्याची यंत्रणा लावावी. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लवकर दूर होणार आहेत. या पंचनामा प्रसंगी जळकोटचे कृषी सहाय्यक जी.एस. कांबळे, श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे, बालाजी पालमपल्ले, बसवराज यादगौडा आदीसह शेतकरी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या