कुपवाड हे माजी आमदार प्रा. शरद पाटील, अण्णासाहेब उपाध्ये, धनपाल खोत इ. सार्वजनिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या कर्तबगार नेते व सरळमार्गी.. अहिंसक जैन समाजाचं गाव.. महापालिका हद्दीतील कुपवाड गावात भ. पार्श्वनाथ जिन मंदीरात दि.१ ऑक्टोबर पासून वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे पर्यूषण पर्व व्याख्यानमाला भक्तीमय वातावरणात सुरु झाली.. धो धो पाऊस कोसळत असतानाही कुपवाडमधील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते हे विशेष..!
दिड तास तीर्थंकर परंपरा.. आचार्य उमास्वामी..आचार्यश्री शांतीसागर व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे, तत्वार्थ सूत्र.. षटखंडागम.. क्रोधाचे प्रकार.. क्षमेचं महत्त्व.. अहिंसा व दयाभाव इ. मुद्दे मांडताना जैन समाजातील युवा वर्गाची धर्माप्रती उदासीनता नष्ट करुन त्यांना जिनवाणीची ओढ लागली पाहिजे या मतांशी सारेच सहमत झाले.
अध्यक्षस्थानी संजय ढोले वकील होते.
यावेळी मलगोंडा पाटील अण्णा, सुलोचना पाटील राजमती अक्का पाटील, नरसगोंडा पाटील,बाबासाहेब चिंचवाडे, बाळासाहेब बोरगावे, सुनिल कवठेकर, कुमार लोकापुरे, अनिल पाटील, दादासाहेब पाटील, प्रसन्ना शेटे सर व श्रावक व श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक आणि पाहुणे परीचय नरसगोंडा पाटील यांनी तर छान सूत्रसंचालन सुरेखा अष्टेकर यांनी केले.
प्रा. एन.डी.बिरनाळे
महामंत्री
दक्षिण भारत जैन सभा