सेवेबाबत 7 ऑक्टोंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला शासनामार्फत 100 इलेक्ट्रिक बसेस दिल्या जाणार आहेत. त्यातील किती बसेस घ्यायच्या, त्याचा थांबा कोठे असेल किंवा या संदर्भात इतर जे काही प्रश्न आहेत ते दिनांक 7 ऑक्टोबर रोजी, दुपारी 12 वाजता समाजातील आजी-माजी पदाधिकारी पत्रकार प्रतिष्ठित व्यक्ती संस्था यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात येणार आहे. ही चर्चा वसंतदादा सभागृह सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका येथे होणार आहे. या संदर्भात आयुक्त सुनील पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली व सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
ही योजना विस्तारीत भागाला जोडण्यासाठी सदर बसेसचा उपयोग करून हनुमान नगर मार्गे सेवा चालू करावी , तेथुन पुढे धामणी , बामणी व दत्तनगरचा विस्तारीत भाग जोडल्यास नागरिकांचा फायदा होईल.