युवा नेते रोहीत आर आर पाटील यांची प्रकृती खालावली , डॉकटर उपोषणस्थळी दाखल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/10/2023 9:04 PM


   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांची प्रकृती बिघडली, उपोषणस्थळी डॉक्टरांचं पथक दाखल.युवानेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. रोहित पाटील यांचं सकाळपासून उपोषण सुरु आहे. उपोषणस्थळी रोहित पाटील यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना ताप आल्याने डॉक्टर उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. टेंभू योजनेत तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करा, या मागणीसाठी रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांचं सकाळपासून उपोषण सुरु आहे.डॉक्टरांच्या पथकाकडून रोहित पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येतेय. रोहित पाटील यांना 102 इतका ताप आहे. रोहित पाटील यांच्या अंगात ताप आल्याने ते उपोषणस्थळी सध्या झोपले आहेत. रोहित पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांची बहीण स्मिता पाटील या सुद्धा घटनास्थळी बसून आहेत. पाणी प्रश्नासाठी रोहित पाटील, आमदार सुमनताई पाटील यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आंदोलनस्थळी जावून आमदार पाटील यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय.टेंभू योजनेच्या अहवालाला तृतीय सुधारित मान्यता मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही,अशी रोहित आर आर पाटील आणी आमदार सुमनताई पाटील यांची भूमिका आहे.*

Share

Other News

ताज्या बातम्या