आवाहन

BREAKING NEWS

बेळगाव हुबळी मार्गावर जाणाऱ्या काही गाड्या रद्द

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/30/2023 10:55:22 PM

 पुणे मिरज लोंढा या मार्गावरील सुरू असलेल्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामानिमित्त विजयनगर ते उगारखुर्द दरम्यान काम सुरू असल्याने गाडी क्रमांक 17332 हुबळी मिरज एक्सप्रेस 28 मे ते 6 जून पर्यंत रद्द करण्यात आलेली आहे तसेच ट्रेन क्रमांक 17331 मिरज हुबळी एक्सप्रेस ही 30 मे ते 7 जून पर्यंत रद्द करण्यात आलेली आहे. गाडी क्रमांक  07351 मिरज लोंढा स्पेशल एक्सप्रेस 28 मे रोजी रद्द राहील. गाडी क्रमांक 17333 मिरज कँसरलॉक एक्सप्रेस ही 29 मे ते 6 जून दरम्यान रद्द राहील. तसेच गाडी क्रमांक 17334 कँसरलाँक मिरज एक्सप्रेस ही गाडी 29 मे ते 6 जून पर्यंत रद्द राहील.गाडी क्रमांक 17415 तिरुपती कोल्हापूर हरीप्रिया एक्सप्रेस 28 मे ते 5 जून पर्यंत बेळगाव ते कोल्हापूर दरम्यान रद्द राहील व गाडी क्रमांक 17416 कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस ही 29 मे ते 6 जून पर्यंत कोल्हापूर ते बेळगाव दरम्यान रद्द राहील  तिरुपतीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बेळगाव येथुन गाडी पकडावी ही गाडी बेळगाव येथिल ठरलेल्या वेळेत सुटेल.अशी माहीती मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या