आवाहन

BREAKING NEWS

*केंद्र कोरची ची तिसरी शिक्षण परिषद संपन्न*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/1/2022 9:28:53 AM

कोरची:         
    आज दिनांक 30 सप्टेंबर 2022 ला कोरची केंद्राची तिसरी शिक्षण परिषद गट साधन केंद्र कोरची येथे मा.यशवंत टेंंभूर्णे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरची यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रप्रमुख  हिराजी रामटेके यांच्या उत्कृष्ट नियोजनात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून हेमराज सुकारे नांदळी, रमेश्वर चिमनकर भिमपूर, अरविंद टेंभूरकर कोरची, उषा बोरकर भिमपूर, ओमकार ठलाल पकनाभट्टी तसेच विषय साधन व्यक्ती प्रमोद वाढणकर, युवराज मोहनकर, प्रभाकर गेडाम, राकेश मोहूर्ले, सांगोळे, वाघमारे आणि फुलोरा सुलभक विनोद भजने, सुभाष गहाणे, दिलीप नाकाडे उपस्थित होते. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी साहेब व फुलोरा सुलभक यांनी गुणवत्तेवर सविस्तर चर्चा केली. केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील विविध उपक्रमाचा आढावा घेतला. संचलन विषय शिक्षक नरेश रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन नरेश मांडवे यांनी केलं. परिषद यशस्वी करण्याकरिता चंद्रशेखर अंबादे, कांता साखरे, त्रिवेणी गायकवाड, शशिकला काटेंगे, वैशाली वानखेडे, विजय मेश्राम, जितेंद्र साहाळा यांनी सहकार्य केलं.

Share

Other News

ताज्या बातम्या