*झाडावर साकारली पर्यावरणपूरक गणपती मूर्ती*; देवळाली कॅम्पमध्ये शिवयुवा प्रतिष्ठान मंडळाचा स्तुत्य उपक्रम

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 22/09/2026 2:41 PM

झाडावर साकारली पर्यावरणपूरक गणपती मूर्ती; देवळाली कॅम्पमध्ये शिवयुवा प्रतिष्ठान मंडळाचा स्तुत्य उपक्रम
​देवळाली कॅम्प/भगूर प्रतिनिधी:
पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी आणि सकारात्मक संदेश देत शिवयुवा प्रतिष्ठान सार्वजनिक महिला गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा अत्यंत अनोख्या आणि कल्पक संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मंडळाने थेट एका जिवंत झाडावर श्री गणपती बाप्पांची पर्यावरणपूरक शाडूमातीची मूर्ती विराजमान केली आहे.
​देवळाली कॅम्प शहरातील अत्यंत गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर, जेथे नागरिकांची सतत ये-जा असते, अशा ठिकाणी हा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. त्यामुळे हा देखावा सध्या सर्व रसिक भक्तांचे आणि स्थानिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
​गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा व संवर्धनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत आणि घराघरांपर्यंत पोहोचावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यंदा ‘भक्ती • संस्कृती • पर्यावरण • समाजसेवा • महिला सक्षमीकरण’ या पंचसूत्री संकल्पनेवर आधारित हा अनोखा व प्रेरणादायी देखावा उभारण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोजाड यांनी दिली.
​मंडळाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आणि पर्यावरणपूरक संदेशाचे संपूर्ण देवळाली कॅम्प परिसर आणि परिसरातून कौतुक केले जात आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या