नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत राष्ट्रीय संकल्प अभियान उत्साहात संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/09/2026 8:47 PM

 देशभक्त आर.पी.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड मध्ये आज रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी मेरा युवा भारत सांगली आणि देशभक्त आर.पी.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने , नशा मुक्त युवा अभियान अंतर्गत "*नशामुक्त युवा फॉर विकसित भारत राष्ट्रीय संकल्प अभियान*" हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
 या सोहळ्यास कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. आनंदराव घाडगे , मेरा युवा भारत सांगली चे उपसंचालक मा. राहुल डोंगरे,राज्य कर अधिकारी जीएसटी विभाग मा.शैलेंद्र पेंडसे ,यशवंत शिक्षण संस्था कुपवाडच्या चेअरमन मा.सौ.सरोज रायनाडे मॅडम ,संस्थेचे सचिव मा. प्राध्यापक एस.ए.पाटील सर , माननीय संचालक श्री. पेंढारी सर मा. रामचंद्र वाघमारे, मा. सुखदेव काळे, मा. तानाजी व्हनमाने, सागर व्हनमाने, प्रशांत पाटील त्याचप्रमाणे इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
 प्रारंभी या मान्यवरांचे स्वागत चेअरमन सौ.सरोज रायनाडे मॅडम, सचिव मा. प्राध्यापक एस.ए.पाटील सर, मुख्याध्यापिका सौ.चव्हाण मॅडम यांनी पुष्प बुके देऊन केले.
 संस्थेच्या चेअरमन सौ.सरोज रायनाडे मॅडम आणि संस्थेचे सचिव मा. प्राध्यापक एस.ए.पाटील सर यांचे स्वागत सौ.चव्हाण मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये  मा.रामचंद्र वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना नशा मुक्त राहण्यासाठी दैनंदिन जीवनातील अतिशय साधी - सोपी आणि रोज पाहण्यात येणारी उदाहरणे देऊन त्यांचे मन  व्यसनमुक्तीसाठी परिवर्तित केले.
कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.आनंदराव घाडगे यांनी युवक व युवातींना आपल्या आई-वडिलांचा सल्ला मानून त्याप्रमाणे वर्तणूक करण्याचा एक मोलाचा संदेश दिला.तारुण्यात युवक युवतींनी घेतलेले निर्णय भविष्यात चुकण्याची शक्यता अधिक असते असाही अनुभव त्यांनी यावेळी व्यक्त केला.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्ती ची शपथ देण्यात आली.
 या कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.चव्हाण मॅडम, तसेच सर्व सहकारी शिक्षकवृंद ,उच्च माध्यमिकचे विद्यार्थी - विद्यार्थिनी त्याचप्रमाणे माध्यमिकचे विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.स.बा.बाबर सर यांनी केले आणि कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Share

Other News

ताज्या बातम्या