ओबीसी जनगणनेत स्वतंत्र रकाना ठेवण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/09/2026 4:08 PM

सांगली, दि. २१ सप्टेंबर २०२६ :
आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी विशेष रकाना तयार करण्यात यावा, तसेच ओबीसी समाजाची जातनिहाय लोकसंख्या व सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीची अचूक माहिती अधिकृतरीत्या संकलित करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग महासचिव मारुती देवकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

सांगली जिल्हाधिकारी मा. मैनाक घोष यांच्यामार्फत हे निवेदन भारताच्या राष्ट्रपती महोदयांना सादर करण्यात आले.

ओबीसी समाज हा देशातील मोठा सामाजिक घटक असूनही जनगणनेमध्ये ओबीसींची स्वतंत्र व अचूक लोकसंख्या नोंद उपलब्ध नसल्यामुळे विविध शासकीय धोरणे, आरक्षण, शैक्षणिक संधी, रोजगार, सामाजिक न्यायाच्या योजना तसेच विकासाच्या कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन करताना अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आगामी जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना ठेवून जातनिहाय व सामाजिक-आर्थिक माहितीचे अचूक संकलन करणे आवश्यक आहे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग महासचिव मारुती देवकर यांनी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या समोर यावी, सामाजिक न्यायाच्या धोरणांना अधिक भक्कम आधार मिळावा आणि आगामी जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद व्हावी, यासाठी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या