*त्रिमूर्ती मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसाद संपन्न*
प्रतिनिधी l देवळाली कॅम्प, येथील त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दिनांक *२० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत* स्टेट बँकेजवळ, नवे बस स्टँड, वडनेर रोड, देवळाली कॅम्प येथे हा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला.
या पूजेचे आयोजन *सदैव आठवणीत - स्व. संजय बाळासाहेब गोडसे* यांच्या स्मृतिप्रित्यर्थ करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, दीपक बलकवडे, तानाजी भोर सह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय लोकांनीं उपस्थित लावत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *नीता संजय गोडसे, पल्लवी कुलकर्णी,कुमार यादव, राजेंद्र गोडसे, पवन गायकवाड, सुभाष यादव, अनिल ठाकूर* शिवाजी गोडसे...अशोक गोडसे. तुळशीराम गोडसे,ओम सजू भाऊ गोडसे... अशोक रिपोटे, हरीश बसरांनी... बारकू आडके सौहम यादव, पपू गोडसे याच्या सह त्रिमूर्ती मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते व समस्त भाविक प्रयत्नशील होते.