**ही नदी तुमच्या बापाची कचरापेटी नाही!**
आज सकाळी सांगलीच्या कृष्णा नदीवरील माई घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांना अत्यंत संतापजनक प्रकार पाहायला मिळाला. **मेलेल्या कुत्र्याला पोत्यात भरून चक्क नदीत फेकून देण्यात आले आहे.**
हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला **लाज वाटली पाहिजे!**
ज्या कृष्णा नदीचे पाणी हजारो लोक पितात, ज्या नदीत नागरिक पोहण्यासाठी येतात, त्याच नदीत मृत प्राणी टाकून **तुम्ही नदीचे प्रदूषण करत आहात आणि थेट लोकांच्या आरोग्याशी खेळत आहात!**
मुक्या प्राण्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे इतके गलिच्छ आणि बेजबाबदार मार्ग कोणाला सुचतात?
**नदी तुमची कचरापेटी नाही!
नदीत काहीही टाकण्याचा तुम्हाला अधिकार नाही!**
आज मेलेला कुत्रा नदीत टाकला आहे, उद्या आणखी काय टाकणार?
आणि मग याच प्रदूषित नदीचे पाणी आपल्या घरात आले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
**सुधरा! असे वागू नका!**
कृष्णा नदी ही आपल्या सर्वांची जीवनवाहिनी आहे. तिचे प्रदूषण करणाऱ्यांना समाजानेही जाब विचारला पाहिजे.
**नदी वाचवा!
पाणी वाचवा!
लोकांच्या आरोग्याशी खेळणे बंद करा!**
**अशा कृत्याचा तीव्र निषेध!**