कदम परिवारात पारंपरिक ज्येष्ठा गौरी पूजन उत्साहात; सुख-समृद्धीसह पावसासाठी केली प्रार्थना

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/09/2026 4:40 PM

नांदेड : जीव्हीसी गंगाधाम सोसायटी,असर्जन नांदेड येथे कदम परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक ज्येष्ठा गौरी पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. परिवारातील सर्व सदस्यांनी एकत्र येत विधीवत पूजन करून गौरीमातेचे आशीर्वाद घेतले.
यावेळी घरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठा गौरीचे पूजन, आरती तसेच धार्मिक विधी करण्यात आले. या सोहळ्यामुळे कदम परिवारामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कदम परिवारातील शिवराज कदम हे नांदेड शहरातील गोकुळनगर परिसरातील पीपल्स हायस्कूल येथे एनसीसी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या परिवाराने मोठ्या हर्षोल्हासात हा पारंपरिक सण साजरा केला.
यावेळी गौरीमातेकडे परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात लवकरात लवकर समाधानकारक पाऊस पडावा, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुख-शांती नांदावी तसेच सर्वत्र सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावे, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. पारंपरिक सणांच्या माध्यमातून कुटुंबातील एकोपा आणि संस्कृतीची जपणूक करण्याचा संदेशही या सोहळ्यातून देण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या