मिरज सिव्हिल दुर्घटनेची उपमहापौर गजानन भाऊ मगदूम यांच्याकडयांच्याकडून पहाणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/09/2026 8:43 PM

** वैद्यकीय सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या...!!

शासकीय रुग्णालयाच्या नूतन प्रवेशद्वाराच्या कमानीचा स्लॅब कोसळल्याच्या दुर्घटनेची #उपमहापौर गजानन भाऊ मगदूम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 
या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार सात कर्मचारी जखमी झाले आहेत. उपमहापौर यांनी रुग्णालयात जाऊन जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमींना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, अशा सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा तत्काळ उपलब्ध करुन देण्याबरोबरच जखमींच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या