मा.सुनील अनंतवार यांना 'राजर्षी शाहू महाराज लोक कल्याण पुरस्कार २०२६' प्रदान नांदेड येथे भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/09/2026 10:34 AM

नांदेड  :- मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड व मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात सामाजिक व आपल्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय, प्रेरणादायी योगदानाबद्दल मा. सुनील अनंतवार यांना 'राष्ट्रीय समता गौरव पुरस्कार २०२६' अंतर्गत 'राजर्षी शाहू महाराज लोक कल्याण पुरस्कार २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता हॉटेल अतिथी, शिवाजी नगर, नांदेड येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या  उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्याचे उद्घाटक व मार्गदर्शक मा. भारतजी वानखेडे (संचालक, जिमखाना मॅको बँक मंत्रालय, मुंबई तथा अध्यक्ष, अनुसूचित जाती, जमाती, वि.जा./भ.जा., इ.मा.व./शा.नि. शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना, मंत्रालय, मुंबई) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. सय्यद मुजीब सय्यद जाहेद (संस्थापक अध्यक्ष, मुजीब भाई मित्र मंडळ, महाराष्ट्र राज्य) यांनी भूषवले. या प्रसंगी व्यासपीठावर मा. इंजि. अंबादासजी चंदनशिवे (विशेष अतिथी - उपसचिव, कृषी विभाग मंत्रालय, मुंबई), मा. राजकुमार एंगडे (स्वागताध्यक्ष - उप नगराध्यक्ष वसमत, नगर परिषद, हिंगोली), तसेच प्रमुख वक्ते म्हणून मा. ॲड. विजय गोणारकर (जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड) व मा. प्रा. जे. टी. जाधव (नांदेड) उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्यास मा. ज्ञानेश्वर बागूल (राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ), मा. गोपाळराव लाड (राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ), मा. डॉ. उत्तम सोनकांबळे (महासचिव, मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटना, मंत्रालय, मुंबई), मा. गंगाधर वडणे (जिल्हाध्यक्ष, मुजीबभाई मित्र मंडळ, नांदेड), मा. रामचंद्र येईलवाड (माजी जिल्हा परिषद सदस्य, नांदेड), आणि मा. शिवकुमार देवकत्ते (जिल्हाध्यक्ष, रा.स.पा., नांदेड) यांची विशेष उपस्थिती लाभली.
सोहळ्याचे नेटके सूत्रसंचालन मा. प्रा. अविनाश नाईक (राज्य अध्यक्ष, कला व विश्व समिती, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ) यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन श्री. शंकरसिंग ठाकूर (संस्थापक अध्यक्ष, मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था) व श्री. मारोती शिकारे (संस्थापक अध्यक्ष, मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था) यांनी केले.
कलाल समाजातील प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती:
या सोहळ्यात विशेषतः कलाल समाजातील श्री. सुधीर भुरेवार, श्री. गंगाधर नंदेवाड, श्री. गणेश बच्चेवार, श्री. शंकर रायपलवार, श्री. बाबाराव नंदेवार आणि कॉ. उज्ज्वला पडलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन मा. सुनील अनंतवार यांना सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अधिकृत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. भारतीय संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि मानवता या मूल्यांना समाजात बळकट करण्याचे कार्य मा. सुनील अनंतवार करत असून त्यांचे कार्य समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे, असे उद्गार मान्यवरांनी आपल्या भाषणातून काढले.
या विशेष आणि प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल मा. सुनील अनंतवार यांचे विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या