राज्यात मुद्रांक शुल्काला येणार ' ई- स्टॅम्प' चा पर्याय, चंदनदादा चव्हाण यांची जनहितार्थ माहिती

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/02/2026 11:53 AM

पुणे विभागा कडील अपडेट : जमीन, सदनिकेसारख्या मालमत्तेची खरेदी करताना भरावे लागणारे मुद्रांक शुल्क आता पारंपरिक 'स्टॅम्प पेपर' शिवाय दुसऱ्या पद्धतीने भरता येणार आहे. त्यासाठी नोंदणी मुद्रांक विभागाने 'ई-स्टॅम्प'चा नवा पर्याय पुढे आणला असून, त्याच्या पद्धतीबाबत सध्या खासगी कंपन्यांकडून चाचपणी सुरू आहे. राज्यातील मुद्रांक विभागात लवकरच 'स्टॅम्प पेपर'ला 'ई-स्टॅम्प'चा पर्याय येत्या एप्रिलपासून अंमलात येणार आहे. या नव्या पद्धतीचा बँका, रिअल इस्टेट; तसेच विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांसह सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांना
मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सोपे आणि सहज व्हावेत यासाठी नोंदणी मुद्रांक विभागाकडून पावले उचलण्यात येत आहेत. 'ई-स्टॅम्प'च्या पर्यायाबाबत विभागात सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावाचत नुकतेच सादरीकरण करण्यात आले आहे. नागरिकांना सध्या स्टॅम्प पेपर मिळविण्यासाठी मुद्रांक विक्रेत्याचा शोध घ्यावा लागतो. मुद्रांक विक्रेता ओळखीचा असल्यास त्याच्याकडून स्टॅम्प सहज मिळतो.

मात्र, अनेकदा स्टॅम्पच्या तुटवड्यामुळे व्यवहारात अडथळे येतात. 'स्टॅम्प पेपर' हा कायदेशीर करारांना वैधता देण्यासाठी मुद्रांक शुल्क भरल्याचा पुरावा म्हणून वापरला जातो. मालमत्ता व्यवहार, विविध प्रकारचे प्रतिज्ञापत्रे, भाडेकरार, गहाणखत, न्यायालयीन प्रक्रिया, कुलमुखत्यारपत्रे, बक्षीसपत्रे; तसेच इतर व्यावसायिक करारांसाठी त्याचा वापर केला जातो.

राज्यात विविध सरकारी, खासगी बँका, इन्शुरन्स कंपन्या, रिअल इस्टेट,पतसंस्थामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॅम्प पेपरचा वापर होतो. त्यांना आवश्यक तेवढे स्टॅम्प पेपर उपलब्ध न झाल्यास त्यांच्यासाठी 'ई-स्टेंटॅम्प'चा पर्याय उपयुक्त ठरणार आहे. देशभरात अनेक राज्यांमध्ये 'ई-स्टॅम्प'चा वापर सुरू झाला आहे. म्हणूनच नोंदणी मुद्रांक विभागाने 'ई-स्टॅम्प'च्या पर्यायाबाबत विचार सुरू सुरू केला असून, त्याबाबत कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे. 'ई-स्टॅम्प'चा वापर करताना एखाद्या व्यक्तीला ठरावीक रकमेचा 'स्टॅम्प पेपर' हवा असल्यास ती रक्कम नोंदणी मुद्रांक विभागाच्या
igrmaharashtra.gov.in या वेबसाइटवर गेल्यास 'ग्रास' (गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम) या पोर्टलवरून मुद्रांक शुल्काची रक्कम भरता येईल. ती रक्कम भरल्यास तेवढ्या रकमेचा मुद्रांक (स्टॅम्प) म्हणून प्रमाणपत्र उपलब्ध होईल. ते प्रमाणपत्रसुद्धा विशिष्ट बारकोड पद्धतीचे असेल. ते प्रमाणपत्र स्टॅम्प पेपर म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकते.

स्टॅम्प पेपर हद्दपार होणार नाही..

राज्यात नोंदणी मुद्रांक विभागाकडून 'ई-स्टॅम्प'चा पर्याय अंमलात येणार असला तरी सध्याचा 'स्टॅम्प पेपर' हा कायमचा बंद होणार नाही. त्याला पर्याय म्हणून आणि सहजरित्या व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी 'ई-स्टॅम्प'ची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना 'ई-स्टॅम्प'चा पर्याय वापरणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी पारंपरिक पर्याय सुरूच राहील. मात्र, ऑनलाइनचा वापर करणाऱ्यांसाठी 'ई-स्टॅम्प'चा पर्याय एका क्लिकवर उपलब्ध असल्याने त्याचा फायदा होऊन काम सोपे होणार आहे.

जनहितार्थ माहिती : गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण, पक्षप्रमुख, जय हिंद सेना, महाराष्ट्र राज्य. Mo : 9421245003.

Share

Other News

ताज्या बातम्या