शुक्रवारी ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन’ कार्यशाळा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 04/02/2026 8:05 PM

नांदेड : राज्यात निर्यात क्षेत्रास चालना देणे, रोजगार निर्मितीला गती देणे तसेच निर्यात वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या ‘जिल्हा हे निर्यात केंद्र’ या उपक्रमास प्रोत्साहन देण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्य शासनामार्फत ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक यांच्यासाठी उद्योगवाढीच्या संधी, उत्पादनांची निर्यात क्षमता, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, तसेच डीजीएफटी (DGFT), निर्यात नोंदणी, धोरणे व सुलभ प्रक्रिया यासंदर्भात तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले आहेत.

या कार्यशाळेमुळे उद्योजकांना निर्यात क्षेत्रातील नव्या संधींची माहिती मिळून जिल्ह्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविण्यास मदत होणार आहे.

तरी नांदेड जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक, निर्यातक्षम उद्योगांचे प्रतिनिधी, बँक अधिकारी तसेच औद्योगिक विकासाशी संबंधित विविध शासकीय विभागांचे प्रमुख यांनी या एकदिवसीय कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शन सत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या