गटई कामगारांसाठी अनुदानावर पत्र्याचे स्टॉल योजनेची व्याप्ती;अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 04/02/2026 8:01 PM

नांदेड : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सन 2025-26 करीता सुधारित मागणी नोंदविण्याकरीता गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेची व्याप्ती वाढवून निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. ग्रामपंचायत नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत असून सदरचा ऑफलॉईन अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड या कार्यालयात उपलब्ध आहे.

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) इच्छुक लाभार्थ्यांनी सदरहू योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील नियम व अटी शर्तीची पुर्तता करुन अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज परीपुर्ण भरुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचे कार्यालयास सादर करण्यात यावा. राज्यातील गटई कामगारांना १०० टक्के अनुदान या तत्त्वावर पत्र्याचे स्टॉलवर कमाल 5 हजार रुपये इतके डीबीटीद्वारे अनुदान देण्यात येते ही अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी आहे.

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागातील 80 हजार व शहरी भागातील 1 लाखापेक्षा अधिक नसावे, अथवा अर्जदार दारीद्रय रेषेखालील असावा. अर्जदराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका, यांनी त्यास भाड्याने, कराराने खरेदीने, अगर मोफत, परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी. किंवा ती जागा त्यांच्या स्वमालकीची असावी. सदर योजनेची गटईस्टॉलसाठी जागा उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी गटई कामगाराची राहील. एकदा गटई स्टॉलची वाटप झाल्यानंतर सदर स्टॉलची विक्री करता येणार नाही. तसेच ते भाडे तत्त्वावर देता येणार नाही. तसेच स्टॉलचे हस्तांतरण करता येणार नाही. याबाबत अनियमितता झाल्यास सदर स्टॉल परत घेण्यात येईल. ज्या कारणासाठी गटई स्टॉल देण्यात आलेला आहे. त्या शिवाय इतर कोणत्याही कारणांसाठी वापरता येणार नाही. असे निदर्शनास आल्यास स्टॉल रद्द करुन अनुदान वसुल करण्यात येईल. एकदा लाभार्थ्यांना स्टॉलचा लाभ दिल्यानंतर स्टॉलची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील. स्टॉलचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देता येईल.

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) घटकांतील सुशिक्षीत बेरोजगार, इच्छुक लाभार्थ्यांकडुन सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत असुन सदरचा ऑफलाईन अर्ज, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. सुशिक्षीत बेरोजगार यांनी सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या