तरोडा खुर्द येथे 5 फेब्रूवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 04/02/2026 2:38 PM

नांदेड :- तरोडा खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ दिनांक ५ फेब्रुवारी रोज गुरुवारपासून होणार आहे अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
सतत ७ दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात काकडा, विष्णु सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, भागवत कथा, हरिपाठ, हरी किर्तन, जागर आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
सप्ताहात भागवताचार्य हभप दीनानाथ महाराज इंजनगांवकर यांची भागवत कथा,हभप त्र्यंबक महाराज दस्तापुरकर, धोंडोपंत महाराज सिंधीकर, बाबुराव महाराज कुदळेकर , व्येंकट महाराज दगडवाडीकर, अँड. यादव महाराज डाखोरे वाईकर, शंकर महाराज लोंढे, भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर, व शेवटचे काल्याचे किर्तन हभप काशिनाथ महाराज माने फुलकळसकर यांचे होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताहात  विणेकरी हभप बाबुराव महाराज कल्याणकर, मृदंगाचार्य विश्वजीत महाराज आळंदीकर, ज्ञानेश्वर माऊली धोतरेकर, गायनाचार्य शंकर माऊली रेगांवणकर, मुरलीधर दिवटे, गणेश राव पळशीकर, रमेशराव पावडेवाडीकर, माधव वसेकर, विश्वनाथ 
वाखरीकर, बाबुराव रहाटीकर, शिवाजी मार्कंडकर, नागोरावजी पिंपळेकर, लालजी माळपुरकर, राजाभाऊ ताडलिंबाळकर व तसेच महापूजा व अभिषेक सतीश महाराज मठपती यांचा सहभाग राहणार आहे. आयोजित अखंड सप्ताहातील सर्व कार्यक्रमास तरोड्यासह नांदेड शहरातील भावीक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तरोडा खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या