भगूर नगरपरिषद विषय समित्यांचे नामनिर्देशने व सभापतीची निवड प्रक्रीया करण्यासाठी व स्थायी समिती रचना व सभापतींची नांवे जाहीर करणे कामी मंगळवारी सकाळी ११.०० वा. झालेल्या विशेष बैठक संपन्न झाली
मा. जिल्हाधिकारी नाशिक यांचे आदेशान्वये भगूर नगरपरिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी भगर नगर परिषदेची विशेष सभा मा.तहसीलदार पंकज पवार नाशिक तथा प्राधिकृत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली ,
विषय समिती सदस्य नामनिर्देशन
सार्वजनिक बांधकाम समिती :
१. देशमुख काकासाहेव जनार्दन
२. बलकवडे विशाल गोरखनाथ
३. बलकवडे दिपक मच्छिंद्रनाथ
४. कस्तुर मनिषा अंबादास
५. चंद्रमोरे सागर विजय
पाणीपुरवठा आणि जलनिःसारण समिती :
१. आडके प्रसाद अंबादास
२. जाधव बबलू दत्तू
३. भवार अश्विनी राहुल
४. गायकवाड कांता शाम
५. सोनवणे सोनाली विक्रम
स्वच्छताविषयक, वैद्यकीय आणि आरोग्य समितीः
१. वालझाडे सुधेश माधव
२. कापसे मृत्युंजय दिनेश
३. इंदारखे अमोल कचरू
४. देशमुख जयश्री काकासाहेब
५. शेख फरीद बापू
महिला व बाल कल्याण समिती :
१. थापेकर लता रामदास
२. शिरसाट सुजाता विशाल
३. बलकवडे विद्या दिपक
४. बुरके सुचित्रा (अर्चना) मंगेश
५. साळवे कापसाबाई विजय
विषय समिती सभापतींची निवडणूक घेणे.
मुख्याधिकारी यांचेकडेस आज दिनांक ०३/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० ते ०१.०० वाजेपर्यत विषय समितीच्या सभापतींसाठी आलेली नामनिर्देशन पत्रे सभेपुढे वाचून दाखविण्यात आली.
उपाध्यक्ष हे पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समितीचे पदसिध्द सभापती असल्याने त्यांची निवड वगळता उर्वरीत सभापती निवडीसाठी पुढील कामकाज सुरु करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती पदी देशमुख काकासाहेब जनार्दन यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यांना सूचक म्हणुन बलकवडे विशाल गोरखनाथ असून अनुमोदक बलकवडे दिपक मच्छिंद्रनाथ हे आहेत.
पाणीपुरवठा समितीचे सभापती पदी आडके प्रसाद अंबादास यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यांना सूचक म्हणुन देशमुख जयश्री काकासाहेब असून अनुमोदक इंदारखे अमोल कचरू हे आहेत.
स्वच्छताविषयक, वैद्यकीय आणि आरोग्य समितीचे सभापती पदी वालझाडे सुधेश माधव यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून गायकवाड कांता शाम. असून अनुमोदक साळवे कापसाबाई विजय आहेत.
महिला व बालकल्याण समितीचे सभापती पदी थापेकर लता रामदास यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणुन शिरसाट सुजाता विशाल असून अनुमोदक भवार अश्विनी राहुल आहेत.
महिला व बालकल्याण समितीचे उपसभापती पदी शिरसाट सुजाता विशाल यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणुन बलकवडे विद्या दिपक असून अनुमोदक बुरके सुचित्रा (अर्चना) मंगेश आहेत.
वरीलप्रमाणे विषय समिर्तीच्या सभापती पदासाठी आलेली सर्व नामनिर्देशन पत्रे मंजूर करण्यात येत आहेत. त्यानंतर वैध रित्या नामनिर्देशीत केलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.विषय समितीसाठी सभापतीकरिता बिन विरोध निवड करण्यात आली .
सदर बैठकीत स्थायी समिती रचना खालीलप्रमाणे
१) बलकवडे प्रेरणा विशाल, अध्यक्ष, (स्थायी समिती पदसिद्ध सभापती)
२) आडके प्रसाद अंबादास, उपाध्यक्ष (सभापती, पाणीपुरवठा आणि जलनिःसारण समिती पदसिद्ध सदस्य)
३) देशमुख काकासाहेब जनार्दन, सभापती, सार्व. बांधकाम समिती.
४) आडके प्रसाद अंबादास, पाणीपुरवठा आणि जलनिःसारण समिती.
५) वालझाडे सुधेश माधव, स्वच्छताविषयक, वैद्यकीय आणि आरोग्य समिती
६) थापेकर लता रामदास, सभापती, सभापती, महिला व बालकल्याण समिती.
येणेप्रमाणे विषय पत्रिकेवरील कामकाज संपल्याने सर्व उपस्थितांचे आभार मानून पिठासीन अधिका-यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.
बैठकी करता नगर परिषदेचे सर्व नवनिर्वाचित सदस्य सह मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल बैठकीला उपस्थित होते .