भगूर शहर नाभिक समाजाच्या वतीने खमताणे येथील नाभिक कन्यावर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध शहरातील दुकाने कडकडीत बंद
भगूर वार्ताहर:- बागलाण तालुक्यातील खमताणे येथील नऊ वर्षीय बालिकेवर नराधमाने केलेल्या अत्याचाराच्या विरोधात भगूर शहर नाभिक समाजाच्या वतीने काल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी समाज बांधवांच्या वतीने निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी भगूर शहरातील सर्वच नाभिक शहर बांधवांनी निषेध म्हणून आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.सदर पीडित बालिकेला न्याय मिळावा तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर अशी शिक्षा द्यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली तर सदर घटनेचा धिक्कार असो अशा अल्पवयीन बालिकांवर होणाऱ्या घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी नाभिक समाजाचे जेष्ठ नेते मोहनराव मगर,यशवंत सैंदाणे,अनिल आंबेकर,अनिल सोनवणे,रघुनाथ मोरे,शिवाजी चित्ते,राम मगर,बाळासाहेब राऊत,संजय मोरे,दिपक कणसे,बाळासाहेब कोरडे,मोहन रायकर,राजेंद्र मगर,शरद जाधव,फकीरराव बिडवई,अजय ठाकूर,शेखर अहिरे,प्रदीप कोरडे,मनोज पगारे,राजेंद्र राकेश मगर भास्कर भदाणे,सोमनाथ भदाणे,दिपक बिडवई, नंदू मोरे,सनी बिडवई,राहुल ठाकूर,राकेश शर्मा,सुनील शर्मा,सागर चित्ते,रामदास नितीन मगर,दुधाडे,अथर्व दुधाडे,श्रेयस दुधाडे,पंकज ठाकूर,सौरभ ठाकूर,दिनेश सूर्यवंशी,विजय वाघ,सुहास सूर्यवंशी,नवनाथ जाधव,देविदास चित्ते,किरण आंबेकर,सचिन आंबेकर,भूषण अहिरे, प्रवीण वाघ आदीसह भगूर शहर नाभिक समाजाचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.तदनंतर नाशिक जिल्हा नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे पिढीतेला न्याय मिळावा यासाठी निदर्शने करण्यात आली यासाठी भगूर व पंचक्रोशीतून शेकडो नाभिक समाज बांधव नाशिक येथील आंदोलनात सहभागी झाले.