खा. शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/12/2025 7:02 PM

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा ८६ वा वाढदिवस पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला

 यावेळी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील व  पदाधिकारी यांनी केक कापून खा शरदचंद्र पवार पवार साहेबांना शुभेच्छा दिल्या...
तसेच बेघर निवारा केंद्र सांगली व हौसाई वृद्धाश्रम सांगली येथे फळे वाटप करण्यात आले 

 या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष देवराज पाटील म्हणाले की , गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ पवारसाहेबांनी जनतेच्या मनावर अधिराज्य केले आहे , शेतकऱ्यांचा तारणहार, महिलांना सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणारा युवकांना समाजकारणात सक्रिय
करण्यासाठी अविरत धडपड करणारा नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पहातो , 

 आजही त्यांचा उत्साह आणि तळमळ आपणाला उर्जा देत आहे.. शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचे पाईक असणाऱ्या पवारसाहेबाना सांगली जिल्ह्याच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.


यावेळी  जिल्हा महिलाध्यक्षा सुस्मिता जाधव यांनीही शुभेच्छा दिल्या...


यावेळी प्रदेश निरीक्षक शेखर माने ,विधानसभा अध्यक्ष सचिन जगदाळे,सांगली शहराध्यक्ष सागर घोडके,  प्रदेश महिला सदस्य कमलताई पाटील मार्केट कमिटीचे संचालक बापूसाहेब बुरसे सांगली मिरज विधानसभा अध्यक्ष प्रदीप सावंत ,संजय औंधकर ,उत्तम कांबळे ,आयुब बारगिर ,विद्या कांबळे ,छाया जाधव , अनिता पांगम ,वैशाली धुमाळ, डॉ शुभम जाधव ,संगिता जाधव ,छाया पांढरे, धनंजय कुंडले,विष्णुपंत पाटील प्रा कृष्णा मंडले प्रा प्रदीप पाटील,ग्याबरीयल तिवडे,विनायक हेगडे ,शितल खाडे, विक्रम शिंदे , अक्षय अलकुंटे, डॉ सतीश नाईक ,अमित चव्हाण , आदित्य नाईक, आदर्श कांबळे,संजय सुंगारे ,नंदकुमार घाडगे,प्रदीप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या