नांदेड पोलीस दलातर्फे मिशन समाधान अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे अनुषंगाने स्थानिक व वरिष्ठ असे एकुण 97 अर्ज काढले निकाली

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 14/12/2025 7:08 AM

नांदेड :- मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दर शनिवारी नागरिकांच्या तक्रार निवारणाच्या अनुषंगाने मोहिम राबविणे बाबत आदेश दिले होते.

नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये प्रलंबित अर्जाची संख्या वाढली होती सदर अर्ज वेळेत निकाली काढणे आवश्यक असल्याने मा.श्री.अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना सदर तक्रारी अर्ज तात्काळ निकाली काढण्यासाठी सुचना दिल्या होत्या.

तक्रार निवारण दिनांचे अनुषंगाने मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक भोकर, यांनी पोस्टे कुंडलवाडी येथे उपस्थित राहून 07 तक्रारींचे निराकरण केले.

तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना त्यांच्या उपविभागातील एका पोस्टेस हजर राहून तक्रारींचे निराकरण करणे बाबत सुचना देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे आज दिनांक 13.12.2025 रोजी नांदेड जिल्हयामध्ये मिशन समाधान अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे अनुषंगाने स्थानिक व वरिष्ठ असे एकुण 97 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

तसेच यापुढे दर शनिवारी सकाळी 11.00 वाजे ते 13.00 वाजता दरम्यान नांदेड पोलीसांकडुन तक्रार निवारणाची मोहिम राबविण्यात येणार असुन त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वता जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोस्टे येथे हजर राहणार असल्याने नांदेड जिल्हयातील सर्व नागरीकांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबधीत पोलीस स्टेशन येथे जावुन त्यांनी दिलेल्या तक्रारीचे निवारण करून घेण्यात यावे, असे मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी आवाहन केले आहे.

सदरची कामगीरी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड, तसेच सर्व पोस्टेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या