नानेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संजय काळे व्हॉइस चेअरमनपदी विष्णू आडके बिनविरोध

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 13/12/2025 9:59 AM

नानेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संजय काळे व्हॉइस चेअरमनपदी विष्णू आडके बिनविरोध 

भगुर वार्ताहर:- राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या व शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून नासिक तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या नानेगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नानेगाव व पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते संजय काळे यांची तर व्हॉइस चेअरमनपदी विष्णू आडके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.काळे व आडके यांची निवड  होताच बाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिश बाजी करत गुलाल उधळत पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला रोटेशन पद्धत असल्याने  काल सोसायटी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अभ्यासिका अधिकारी केतन तावरे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव संजय गवळी केशव बोंबले यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले सोसायटीचे संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार सरपंच ज्ञानेश्वर शिंदे,माजी सरपंच प्रमोद आडके यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर,सोसायटी संचालिका ताराबाई शिंदे,लिलाबाई आडके,सरपंच ज्ञानेश्वर शिंदे माजी सरपंच प्रमोद आडके,अशोक आडके,संजय आडके, भाजप तालुका सरचिटणीस हिरामण आडके,संदीप शिंदे,राजाराम शिंदे,पोलीस पाटील संदीप रोकडे,वासुदेव पोरजे, नवनाथ शिंदे,भाऊसाहेब शिंदे,भानुदास शिंदे,शरद शिंदे,राजाराम पानसरे,श्याम दळवी,सुनील चव्हाणके,जगन शिंदे,सुनील मोरे,तानाजी आडके,ज्ञानेश्वर काळे,गोपी जाधव,संपत बर्डे,संजय काळे,माधव शिंदे,राहुल आडके,संतु आडके,चंद्रकांत आडके,भगवान आडके,तानाजी काळे,अनिल पोरजे,संदीप काळे,सुदाम रोकडे,दत्तू रोकडे,सुरेश काळे,समाधान काळे,सुमित काळे,संजय शिंदे,दत्तू काळे आदिसह सोसायटी संचालक ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोट
शेतकरी सभासद व संचालक मंडळ यांनी टाकलेली जबाबदारी निस्वार्थीपणे पार पाडत शासनाच्या विविध योजना सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील सर्व संचालक मंडळांच्या सहकार्याने सोसायटीचा विकास कसा होईल याकडेच प्रमुख उद्देश राहील सोसायटीच्या विकासासाठी सदैव कटिबद्धच राहील 
संजय काळे 
चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी नानेगाव 


Share

Other News

ताज्या बातम्या