जिल्हा अजिंक्यपद खो- खो स्पर्धेत राणाप्रताप पुरुष संघास उपविजेतेपद तर महिला संघास तृतीय क्रमांक...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/12/2025 1:46 PM

    नागठाणे येथे पार पडलेल्या जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुपवाडच्या राणाप्रताप  पुरुष संघाने उपविजेतेपद पटकावले तर मंडळाच्या महिला संघास तृतीय क्रमांक मिळाले.
     नागठाणे (ता. पलुस )येथे झालेल्या पुरुष - महिला जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुपवाड चा राणाप्रताप मंडळाच्या पुरुष संघाने उपविजेतेपद मिळविले. तर राणाप्रताप महिला संघाने तृतीय क्रमांक मिळवले. या स्पर्धेतील पुरुष गटातील उत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणुन राणाप्रताप मंडळाचा खेळाडू कु.आयुष लाड यांस गौरवण्यात आले. 
     खेळाडूंना राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, अजित पाटील,रमेश पाटील,  प्रशिक्षक संतोष कर्नाळे, संजय हिरेकुर्ब, प्रा.सचिन चव्हाण, विशाल बन्ने, महेंद्र पाटील,प्रा.विजय पाटील, विजय पाडळे,सागर नरदेकर, महेश कर्नाळे,अतुल पाटील, अनिल पाटील, शेखर स्वामी, राहुल गवळी,शिवसागर पाटील, धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, प्रमोद वालकर, शितल अकिवाटे,शितल कर्नाळे,अक्षय पाटील, धनंजय पाटील, तक्षक गौडाजे,सुनिल सुतार, अभिषेक कर्नाळे,निलेश पवार, अमोल पाटील, अभय सुतार, शुभम पाटील, दिपक पाडळे,स्वप्नील पाटील, पोपट नरदेकर,वासुदेव जमदाडे आंदिचे मार्गदर्शन मिळत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या