उत्तम आरोग्यासाठी योग अनिवार्य : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आ. कल्याणकर यांच्यासह योग शिबिराचे कौतुक

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 14/12/2025 8:59 PM

नांदेड :- शिवसेना पक्ष व नित्ययोग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने रोगमुक्तीसाठी संगीतमय योग शिबिराचा थाटात समारोप
नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विकासाची कामे करत असतानाच जनतेची आरोग्य उत्तम राहावे निरोगी राहावे यासाठी आ. बालाजीराव कल्याणकर यांनी पुढाकार घेऊन संगीतमय योग शिबिर आयोजित केले आहे. या योग शिबिरातून आपल्या सर्वांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण लाभ होणार आहे . त्यामुळे शिबिर संपले असले तरी तुम्ही मात्र नियमितपणे स्वतःसाठी योग करत रहा असे आवाहन करतानाच आ. बालाजीराव कल्याणकर आणि योगी शिबिराचेही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे यांनी आज कौतुक केले.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात सह नांदेड शहरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य आणि वैयक्तिक जीवन सुदृढ आणि समृद्ध असावे आरोग्यदायी असावे यासाठी आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आणि एकनाथ कल्याणकर , सुहास बालाजी कल्याणकर, योगेश मुंडे यांच्या पुढाकारातून भक्ती लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या रोगमुक्त संगीतमय योग शिबिराचा आज थाटात समारोप करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अभासी माध्यमातून या योग शिबिराचा समारोप केला.
यावेळी दीप प्रज्वलना करिता सेवानिवृत्त प्राचार्य व शिक्षण तज्ञ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. अरविंद देशमुख, लेखक मा.भगवान अंजनीकर, उत्तम वक्ते  डॉ. दीपक कासराळीकर, ज्येष्ठ नाट्य कलावंत त्र्यंबक मगरे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, इंजि. तानाजी हुसेकर, ब्रह्मकुमारीज शिवप्रेमा बहिणजी, ब्रह्मकुमारीज जयमाला बहिणजी, ज्येष्ठ महिला संगीतकार व गायिका आनंदी विकास, दै. देशोन्नती आवृत्ती संपादक अनिल कसबे, ज्येष्ठ छायाचित्रकार विजय होकार्णे , कवियत्री तथा साहित्यिका रुचिरा बेटकर, हर्षदजी शहा, ॲड.शिवाजी हाके,जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, गंगाधर बडूरे,जिल्हाप्रमुख मंगेश कदम, सहसंपर्क प्रमुख संतोष भारसावडे, तालुका प्रमुख धनंजय पावडे, शहरप्रमुख उमेश दिघे, प्रमुख राजू गुंडावार, शहर प्रमुख संतोष मादनवाढ,
 सतीशजी सामंते, पंडितराव कदम, जी नागया, ओमकार रहाटे, रवी कडगे, विश्वनाथ देशमुख , माजी नगरसेवक शाम बन, शहाजी पाटील आढाव, मनमित सिंग कुंजीवाले, गणेश बोकारे, दीपक भोसले, पांडुरंग शिंदे, गोविंद भुरे, मधुकरराव देशमुख, व्यंकटराव देशमुख, विश्वनाथ कल्याणकर, प्रल्हाद आयनेले,डॉ.प्रकाश शिंदे, डॉ. श्रीकांत लोहेकर, मनोज वडजकर, उत्तमराव कल्याणकर,भीमराव कल्याणकर , डॉ. रवी सरोदे, मुंडकर सर, नागनाथ जंगेपल्लेवाड, गजानन कदम, संतोष मुगटकर, बाळू पाटील धुमाळ, दिगंबर पाटील कल्याने श्रीरामवार, सांजय लालपोतू, पंकज आईनेले, महेश सोमवार, मकरंद मांजरमकर, विनायक बारहाते,कृष्णा केदारे, श्रीकृष्ण घोलप, पंकज चव्हाण, गोविंद मांजरमकर,तेजस कोटलवार ,सोपान कदम, ज्ञानेश्वर पांचाळ,बालाजी शिंदे, रंजनाताई सोनटक्के, रेखाताई धूत ,अनिता आणेराय,शीला मेंडके, शितल चव्हाण, मेघा कुरळेकर, येलो ग्रुप मॉर्निंग वॉक चे अध्यक्ष सुरेशजी वाघमारे , प्रकाश राठोड, पुरुषोत्तम टाले, आत्माराम पवार ,श्रीपत जामकर,अनिलआप्पा भुरे, प्रल्हाद आडे,सुभाष भोसले, विलास लोकमतवर, बालाजी लाडेकर पाटील , स्वर संगीताची साथ स्वरनिनाद संगीत संच वतीने प्रणव पडोळे व शिवकांता पडोळे आदी उपस्थितीत होते. 
यावेळी योग गुरु नांदेड भूषण श्री सिताराम सोनटक्के यांना सन्मानपत्र देण्यात आले त्या सन्मान पत्राचे वाचन सौ सुरेखा धूत यांनी केले. भक्ती लॉन्स नित्ययोग समितीचे प्रसिद्धी प्रमुख तसेच इंडिया टीव्ही चे माजी जिल्हा प्रतिनिधी मकरंद पांगरकर यांनी सदरील कार्यक्रमाचे आठ दिवस लाईव्ह प्रक्षेपण केले.  सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल व महेश चव्हाण यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून या विषयाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे यांचा आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षद शहा , डॉ .दीपक कासराळीकर ,  विजय होकार्णे आणि आ. बालाजीराव कल्याणकर यांची समायोजित भाषणे झाली.  त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभासी पद्धतीने या योग शिबिराचा समारोप केला.

Share

Other News

ताज्या बातम्या