सांगली शहरासह संपूर्ण जिल्हा सर्वसामान्य जनतेने आपल्या कष्टाने, नवनव्या संकल्पना सत्यात उतरवून मोठ्या जिद्धीने घडवीला आहे. स्वातंत्र्य लढ्यातील अतुलनीय योगदान सहित, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक,राजकीय, सहकार, क्रीडा, कृषी, प्रशासन, विज्ञान, संशोधन, शैक्षणिक, तंत्रज्ञान,अशा असंख्य क्षेत्रात सांगली जिल्ह्याने कायमच आपला लौकिक सातत्याने राखण्याचा, जपण्याचा, वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने नावारूपास असलेला सांगली जिल्हा सद्यस्थितीत गुन्हेगारी आणि नशाखोरीमुळे वेगळ्याचं वळणावर आहे. सर्वसामान्य कष्टकरी,नोकर वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरुण मुलामुलींच्या मध्ये यामुळे निश्चितच भीतीचे, असुरक्षिततेची भावना आहे. सामाजिक स्वास्थ, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून 'भयमुक्त व नशामुक्त अभियान' सुरू करण्यात आले. सुरुवातीला अभियानाच्या माध्यमातून सर्व सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष यांनी एकत्रितरित्या सांगलीच्या ऐतिहासिक स्टेशन चौक येथून प्रशासनास जागे करण्यासाठी लक्षवेधी धरणे आंदोलन केले.
प्रशासनाबद्दल सामान्य जनतेमध्ये असलेला रोष, त्याची जाणीव प्रशासनास व्हावी म्हणून सातत्याने सलग दोन आठवडे प्रतिकात्मक स्वरूपात शस्त्र परवाना मागणी अर्ज' सामान्य जनतेकडून स्वीकारण्यात आले. तब्ब्ल पंधरा हजार पेक्षा अधिक सांगलीतील सुज्ञ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सांगलीच्या जनतेची असुरक्षिततेची भावना महाराष्ट्रचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन स्वरूपात भयमुक्त नशामुक्त अभियान, समितीच्या वतीने पंधरा हजार शस्त्र परवाना मागणी अर्जासह देणार आहोत. मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक मा. संदीप घुगे आणि जिल्हाधिकारी मा. अशोक काकडे यांना कळविले आहे. अद्यापही प्रशासनाकडून काहीही कळविण्यात आलेले नाही.
प्रशासनाकडून कसलाही संपर्क करण्यात आला नसला तरी नेहमीप्रमाणे सुरु असलेले अभियान यापुढेही सुरूच राहील. उद्या आरसिटी मॉल, सांगली मिरज रोड, विश्रामबाग, सांगली या ठिकाणी सकाळी नऊ पासून प्रतिकात्मक शस्त्र परवाना मागणी अर्ज स्वीकारण्याची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती अभियानचे प्रमुख निमंत्रक यांनी दिली आहे.
प्रमुख निमंत्रक,
मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष शंभूराज काटकर, सृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे, बीएसएनएलचे समिती सदस्य युसुफ ऊर्फ लालू मिस्त्री, व्यंगचित्रंकार रोहित कबाडे, मराठा सेवा संघचे नितीन चव्हाण, नागरिक जागृती मंचचे आर्किटेक रवींद्र चव्हाण, तानाजी रुईकर, यांच्यासह इतर प्रमुख निमंत्रक.