बार्न्स स्कुल मध्ये चिमुकल्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय विद्यालय- १ च्या मुख्याध्यापिका सोनिया जैन या उपस्थित होत्या . आजच्या या कार्यक्रमान यु केजी ते दुसरी पर्यंतच्या चिमुल्यांनी रॅम्प वॉक मधुन शिक्षक ,डॉक्टर, कॅमरामॅन, चित्रकार संगीतकार वैमानिक, सैनिक यांच्या भूमिका साकारल्या पहिल्याच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक ऋतुंचा आस्वाद घेणारे नृत्य सादर केले . स्पेन ,इरान ,मॅक्सिको इंडोनेशिया,जपान अशा विविध देशांतील संस्कृती सादर करत असताना आपल्या समृद्ध अशा भारतीय संस्कृतीचे ही सादरीकरण केले , या कार्यक्रमात वृक्षारोपण आणि संवर्धनाचे महत्व ही आपल्या कलाअविष्कारातून सांगितले .या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका उत्तरा कुलकर्णी आणि निवृत्त सी ई ओ समीर सरदाना उपस्थित होते.