शस्त्र परवाना मागणी अर्जाची १५ हजाराकडे वाटचाल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/12/2025 7:05 PM

* महंमद पैगंबरांच्या विचारांचा वारसा म्हणजेच 'भयमुक्त नशामुक्त अभियान'

*  भयमुक्त नशामुक्त अभियान'मध्ये सुशिक्षित होतकरू तरुणांचा ओढा

* ठिणगी, वणव्यामध्ये रूपांतरीत होण्यापूर्वी प्रशासनाने आश्वासक कारवाई करणे गरजेचे 

* मुस्लिम समाजातून अभियान'बद्दल समाधान व्यक्त तर प्रशासनाविरोधात तीव्र खदखद

मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांचा वारसा म्हणजे 'भयमुक्त नशामुक्त अभियान' असल्याची भावना आज सांगली मिरजेतील मुस्लिम समाज बांधवानी व्यक्त केली. 
 'भयमुक्त नशामुक्त अभियान'च्या माध्यमातून सातत्याने बारा दिवस जनजागृती केली जाते आहे. सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये नशा, गुन्हेगारीने आपले जाळे बळकट केल्याचे चित्र आहे. सामान्य, कष्टकरी, होतकरू, तरुण, महिला, प्रामाणिक माणसांच्यामध्ये सध्या असुरक्षिततेंच वातावरण निश्चितच आहे.

अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला जागे करण्यासाठी, जिल्ह्यातील विदारक वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपाचे आंदोलन म्हणून 'शस्त्र परवाना मागणी अर्ज' भयमुक्त नशामुक्त अभियानच्या माध्यमातून स्वीकारत आहोत. अल्पावधीतच तब्ब्ल पंधरा हजार अर्ज सुज्ञ, जागृत नागरिकांनी भरून, प्रशासनाविरोधातील खदखद आणि तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

नुकतेच संकष्ट चतुर्थी निमित्त हिंदू बंधू भगिनींनी या अभियान'ची गरज आणि महत्व ओळखून हजारो शस्त्र परवाना मागणी अर्ज भरीत 'दिखाऊगिरी' करणाऱ्या प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. आज सांगली मिरजेतील मुस्लिम समाज बांधवानी या समाजोपयोगी अभियान'मध्ये अत्यंत तळमळीने सहभाग नोंदवीत हजारो अर्ज भरले.
यामध्ये फौजदार मोहल्ला नवीन मस्जिदचे मा. करीम मिस्त्री, मा. अमन पठाण, मा. अकबर शेख,  मा. गौस नदाफ, मा. नूर मोहम्मद जमादार, मा. सागर कोळेकर त्याचबरोबर ; आकसा मस्जिद संजयनगरचे मा. वसीम बलबंड, मा. इर्शाद पखाली, मा. जाफर शेख, आणि मिरज शहरातील शाही अली रजा मस्जिद, दर्गा परिसरातून उस्फुर्त सहभाग अनुभवण्यात आला. याठिकाणचे नियोजन मा. निसार मुश्रीफ, मा. हाफिज शहाबाज, मा. हुसेन मुल्ला, मा. फिरोज शेख, मा. इकबाल मणेर, मा. डॉ.  जावेद तारळेकर, मा. अफजल शेख, मा. महमद जमादार, मा. डॉ. नईम मणेर यांच्यासह
सर्व ट्रस्टी उपस्थित होते. 
एकूणच, या अभियान'ची व्याप्ती पाहता "सर्वधर्मीय आणि सर्वकर्मीय" अर्थात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शिक्षक, डॉक्टर, सरकारी नोकर, महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, विद्यार्थी इत्यादी स्वयंस्फूर्तीने सहभागी होताना दिसताहेत. जनचळवळ अधिक बळकट होताना दिसते आहे. ठिणगी आता वनव्याचे रूप घेताना दिसते आहे. प्रशासनाने 'भयमुक्त नशामुक्त सांगली' जिल्ह्यासाठी वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या