स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे "नमो उद्यान" निधी वर्ग करून नामकरण करण्याचा घाट सावरकरांच्या जन्मभूमीत "स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान असावे" अशी मागणी नमो उद्यानाला विरोध नमो उद्यानाच्या निधी नाही मिळाला तरी चालेल अशी मागणी शिवसेना उबाठा भगूर शहरप्रमुख श्री काकासाहेब देशमुख
भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे २४ वर्षापासून रखडलेले काम अजूनही सदरील उद्यानाचे काम पुरातत्त्वास गेले नाही शासनाच्या नवीन निधी अंतर्गत नमो उद्यान घोषणा केली आहे सदरील नमो उद्यानांतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानासही एक कोटीचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे, परंतु सदरील उद्यान नमो उद्यान की सावरकर उद्यान?
राज्य सरकारने प्रत्येक नगर परिषद हद्दीत “नमो उद्यान” उभारण्यासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय ऐकून भगूरकरांच्या सावरकर प्रेमींच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जन्मगावात गेली २४ वर्षे सावरकर उद्यानाच्या नावाखाली योजना प्रलंबित आहे. निधी, प्रशासनाची इच्छाशक्ती आणि राजकीय हस्तक्षेप स्थानिक राज्यकर्त्यांचा इच्छाशक्तीचा अभावामुळे सावरकर उद्यान आजही करोडो रुपये खर्च करूनही अपूर्णच आहे.
आता अचानक आलेल्या नमो उद्यानाच्या निधीमुळे परिस्थिती बदलू शकेल का, हा प्रश्न गंभीर आहे. कारण, भगूरसारख्या ऐतिहासिक आणि राष्ट्रीय वारसा असलेल्या गावाला “नमो उद्यान” हवे की “सावरकर उद्यान” हे ठरवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भगूरची सध्याची गत अशी आहे कि, २४ वर्षांपासून सावरकर उद्यानाचे काम चालू आहे कोटी रुपये पर्यंत आतापर्यंत खर्च करण्यात आला आहे यात प्रशासनाचा व राजकीय भ्रष्टाचाराचाही वास मोठ्या प्रमाणात नागरिकांना येत आहे परंतु भनपा व शासनाकडून ठोस कृती झाली नाही. उद्यान नसल्यामुळे गावातील मुलांना, कुटुंबांना, पर्यटकांना सावरकर स्मारक सोडून कोणताही परिसर नाही सावरकर स्मारक म्हणून फक्त स्वप्न राहते की काय अशी भीती नागरिकांच्या मनात आहे पर्यटकांनाभेट देण्यास योग्य इतर ठिकाणांची कमतरता आहे. ऐतिहासिक वारसा असूनही विकासाची राजकीय इच्छाशक्तीमुळे गाडी थांबलेली आहे. त्यातच जर
१ कोटी रुपये “नमो उद्यान” या नावाने वापरले गेले, तर सावरकर उद्यानाची संकल्पना अधिक मागे ढकलली जाईल. पुढे नावावरून वाद वाढण्याची शक्यता निर्माण होईल. भगूरकरांना सावरकर उद्यान अपेक्षित आहे, पण राजकीय स्तरावर ‘नमो उद्यान’ लागू शकते. निधीचा उपयोग जनतेच्या फायद्यासाठी व्हावा नाव काहीही असो, परंतु गावात एक सुसज्ज उद्यान तयार होणे ही प्राथमिक गरज आहे.
. सावरकरांच्या जन्मगावाला “नमो उद्यान” नव्हे, तर “सावरकर उद्यान” हवे अशी उबाठा, शिवसेना सावरकर प्रेमी गावकऱ्यांची ठाम भूमिका असेल, तर निधीच्या नावाखाली शासनाचा व प्रशासनावर दबाव येईल. अन्यथा, २४ वर्षे थांबलेले सावरकर उद्यान हे नावापुरतेच राहील. तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने सावरकर उद्यान नाव देण्यात यावे अन्यथा नमो उद्यान निधीचा एक रुपयाही जरी उद्यानात नाही भेटला तरी चालेल परंतु सावरकरांच्या व्यतिरिक्त उद्यानास किंवा उद्यानाच्या कोणत्याही भागास नमो उद्यान नाव देण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना उ बा ठा शहरप्रमुख श्री काकासाहेब देशमुख दिनेश आर्य पद्माकर शिरसाट सुभाष जाधव उत्तम पाटील सुधाकर घायवटे लिलाबाई दिवटे देविदास जाधव मयूर काळे सावरकर प्रेमी मनोज कुवर संभाजी देशमुख मंगेश मरकड योगेश बुरके गजानन आंधळे सौरभ कुलकर्णी गणेश राठोड पवन आंबेकर अभिषेक चव्हाण यांनी केली आहे