धन्यवाद, तुमच्या शुभेच्छा व पाठबळ अमूल्य : मा. नगरसेवक अभिजीत भोसले

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/09/2025 11:54 PM

#मी_अभिजीत_भोसले_आपला_मनापासून_आभारी_आहे 
#धन्यवाद_शुभेच्छा_पाठबळ_मूल्यवान_आहे 

काल माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा दिल्यात. प्रत्यक्ष भेटून,व्हाट्सअप सोशल मीडिया माध्यमातून, कॉलवर खूप साऱ्या शुभेच्छा माझ्यासाठी आपल्या सर्वांनी दिल्या. शुभेच्छांचे बळ माझ्या पाठीशी उभं केलं, आणि खऱ्या अर्थाने मी ह्या शुभेच्छामुळे भरून पावलो. सामाजिक क्षेत्रात काम करताना आपल्या शुभेच्छा ही आपल्या सर्वांशी माझ्या जोडल्या गेलेल्या नात्याचं प्रतिबिंब आहे असच मी म्हणेल. म्हणून तर आज आपल्या शुभेच्छामुळे आपल्या नात्यात समृद्ध आणि श्रीमंत झाल्याची भावना आज मनातून जाणवते. ही आपल्या नात्यांची श्रीमंती हीच माझी मिळकत.. ही मिळकत मी मनापासून जपेल, कायम प्रयत्न करील ह्या नात्यांना जबाबदारीने जपायला. शुभेच्छा साठी आभारी आहेच, पण ह्याच शुभेच्छांचे बळ घेऊन आणखी जास्त ऊर्जेने ताकदीने काम करेल...  सदैव सेवेत राहील.सर्वांचे खूप खूप आभार. मनापासून आभारी आहे.  

#मी_म्हणजे_तुम्ही_आणि_तुम्ही_म्हणजे_मी...

#तुमच्यातलाच_आपला_तुमच्या_सर्वांचा 
अभिजीत दत्तात्रय भोसले 
मा. नगरसेवक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका

Share

Other News

ताज्या बातम्या