जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात काल इंडिया आघाडी व महाविकास आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीने शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज दादा पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम दादा सावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या आंदोलनामध्ये आमदार रोहित दादा पाटील यांनी विधानसभा सदस्य म्हणून व जिल्ह्यातला महाविकास आघाडीचा नेता म्हणून भूमिका मांडली या आंदोलनाला तीव्र रूप देण्याचे ठरले त्याचबरोबर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात प्रत्येक गावागावात जाऊन या विधेयकाबद्दल जनजागरण करून लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या संस्था संघटना आणि लोकप्रतिनिधींना समाजसेवकांना बांधून ठेवण्याचे हे विधेयक आहे अशी भावना व्यक्त केली या वेळेला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते...!