मिरज तालुक्यात " सेवा पंधरवडा " अभियानाचा शुभारंभ

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/09/2025 7:15 PM

सांगली, दि. १२,
 महाराष्ट्र शासनामार्फत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि. 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दि. 02 ऑक्टोबर रोजी जयंती या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये महसूल विभागाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे कामी "सेवा पंधरवडा उपक्रम" आयोजित केलेला आहे. या अनुषंगाने मिरज तहसील कार्यालयामार्फत उपस्थितीत "महसूल योजना वाहिनी" या वाहनास राज्याचे अपर मुख्य सचिव, महसूल विकास खारगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वाहनाच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपर्यंत मिरज तालुक्यातील सर्व गावात महसूलच्या विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. 

सेवा पंधरवडा अंतर्गत 17 सप्टेंबर रोजी मिरज तालुक्यातील सर्व गावात विशेष ग्रामसभा आयोजित करून गावातील सर्व शिव रस्ते, पाणंद, गाडी मार्ग, पाय मार्ग या रस्त्यांची पडताळणी करणे व त्याची नोंद शासन दप्तरी घेणे बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र अर्जदार यांना जमीन वाटप करण्याची कार्यवाही, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिव्यांग लाभार्थी यांना संजय गांधी योजना लाभ मंजूर करण्यात देण्याबाबत लोकाभिमुख उपक्रम आयोजित केला असल्याची माहिती मिरजच्या तहसीलदार डॉ. मोरे-धुमाळ यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या