*शक्तिपीठ महामार्ग बाधित* *शेती बचाव कृती समिती जि. सांगली
आज होळी. आजच्या दिवशी या पृथ्वीतलावरील सर्व वाईट गोष्टींची होळी करण्याचा दिवस. या दिवशी सर्वजण एकत्र येवुन हा होळीचा सण साजरा करताना दिसतात.
आम्हीही आज होळीचे निमित्त साधून होळी सण साजरा करण्याचे ठरवले आहे. पण ती होळी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची.
हो, शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या वतीने आज आम्ही शक्तिपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची होळी करणार आहोत, स्टेशन चौकात ६ वाजता.
कालच मुंबईत हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, विरोधी पक्षांनी स्थगन प्रस्तावही आणला. परंतु मुख्यमंत्री आपला आग्रह सोडायला तयार नाहीत. त्यामुळे पुढे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणुन आजची होळी आम्ही शेतकर्यांच्या घरादारावरुन नांगर फिरवणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची होळी करुन साजरा करीत आहोत.
उमेश देशमुख, महेश खराडे, सतिश साखळकर