नांदेड :समाज कल्याण विभागांतर्गत नांदेड येथे दिनांक 17 व 18 रोजी सकाळी 8.00 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रांगणात समाज कल्याण अस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांच्या विभागीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर विभागीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
सदर क्रिडा स्पर्धा करिता समाज कल्याण विभागाती लातूर,उस्मानाबाद,हिंगोली नांदेड जिल्हयातील शासकीय मुला-मुलींचे निवासी शाळेतील विद्यार्थी -विद्यार्थीनी तसेच अधिकारी कर्मचारी हे सदर क्रिडा स्पर्धचे स्पर्धक रहणार आहेत.
समाज कल्याण विभागीय क्रिडा स्पर्धा मध्ये आऊडोअर(क्रिकेट,खोखो,कबड्डी,व्हॉलीबॉल,थाळीफेक,रस्सीखेच, फुटबॉल) व इनडोअर क्रिडा स्पर्धा(बॅडमिंटन,टेबलटेनिस,बुध्दीबळ)घेण्यात येणार आहेत. सदर विभागीय क्रिडा स्पर्धा करिता शासकीय निवासी शाळा व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील सर्व विभागाचे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
तसेच वैयक्तीक खेळामध्ये बुध्दीबळ स्पर्धा, 100मीटर धावणे स्पर्धा ,200 मीटर धावणे 400 मी.धावणे , लांब उडी, थाली फेक, या स्पर्धामध्ये महिला व पुरुष अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग रहणार आहे अशी माहिती शिवानंद मिनगीरे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी दिली आहे.