सांगली प्रतिनिधी
सांगलीतील त्रिकोणी बागेची सध्या दुरवस्था झाली असून अनेक बाकडी तुटली आहेत तर कचरा वेळच्यावेळी उचलला जात नाही. बाकडी तुटल्याने नागरिकांना बसण्यासाठी गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी अथवा योगा करण्यासाठी या बागेमध्ये निवारा करण्यात यावा अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे.
दरम्यान या समस्येकडे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी लक्ष घालून त्वरित दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी मनोज भिसे यांनी केली आहे.